esakal | नारायण राणे म्हणजे राजकारणातील बेरोजगार, केवळ ‘टीआरपी’साठी बोलतात 
sakal

बोलून बातमी शोधा

नारायण राणे म्हणजे राजकारणातील बेरोजगार, केवळ ‘टीआरपी’साठी बोलतात 

कोकणमध्ये कोणते विकास कामे केले, एक सुध्दा प्रकल्प ते आणू शकले नाही. त्यामुळे त्यांना कशावरही बोलण्याचा अधिकार नाही.

नारायण राणे म्हणजे राजकारणातील बेरोजगार, केवळ ‘टीआरपी’साठी बोलतात 

sakal_logo
By
कैलास शिंदे

जळगाव: राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्याकडे सध्या कोणतेही काम नाही, ते बेरोजगार आहेत. ते राजकारणातील सशीक्षत बेरोजगार आहे. त्यामुळे आपले महत्त्व व चर्चेत राहण्यासाठी तसेच ‘टीआरपी’ वाढविण्यासाठी केवळ ते बोलत असतात. अशी टीका राज्याचे पाणीपुरवठा, स्वच्छता व जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केली. 

जळगाव येथे रानभाजी महोत्सवाच्या उद्‌घाटनानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. नाणार प्रकल्पासंदर्भात नारायण राणे यांनी वक्तव्य करतांना पैसे कमविणे हा शिवसेनेचा धंदा आहे, असा आरोप केला होता. त्यासंदर्भात विचारलेल्या प्रश्‍नाला उत्तर देताना मंत्री पाटील म्हणाले, की राणे मुख्यमंत्री असतांना त्यांनी कोकणमध्ये कोणते विकास कामे केले, एक सुध्दा प्रकल्प ते आणू शकले नाही. त्यामुळे त्यांना कशावरही बोलण्याचा अधिकार नाही अशी सडकून टिका मंत्री पाटील यांनी केली.  

महाराज हे प्रत्येकाच्या मनात 
कर्नाटक सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटविल्याबाबत बोलतांना ते म्हणाले, की कर्नाटक सरकार छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवू शकते. मात्र, जनतेच्या मनातून काढू शकत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी दिल्लीला त्या ठिकाणी जाऊन झुकविले आहे. तर कर्नाटक सरकार काय विशेष आहे. जगात सूर्य, चंद्र आहेत, तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज आहेत. त्यांचा पुतळा हटवून कर्नाटक सरकारने आपल्या पायावरच कुऱ्हाड मारून घेतली आहे.  

 
संपादन- भूषण श्रीखंडे