esakal | 'ईडी'ची चौकशी पूर्ण झाल्यानंतर बोलणार..!
sakal

बोलून बातमी शोधा

'ईडी'ची चौकशी पूर्ण झाल्यानंतर बोलणार..!

'ईडी'ची चौकशी पूर्ण झाल्यानंतर बोलणार..!

sakal_logo
By
टीम ई सकाळ

जळगाव ः राष्ट्रवादी काँगेसचे जेष्ट नेते एकनाथराव खडसे (Leader Eknathrao Khadse) आज मुंबईवरून (Mumbai) जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथे आले. यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी खडसेंची भेटी घेवून त्यांच्याशी चर्चा केली. यावेळी माध्यमांनी बोलण्यास त्यांनी नकार देवून 'ईडी' (ED) ची चौकशी सुरू असून त्यावर बोलणे सद्या उचीत होणार नाही. चौकशी पूर्ण झाल्यावर मी बोलेल अशी प्रतिक्रिया दिली.

(ncp leader eknath khadse ed will speak after the inquiry)

हेही वाचा: वाढदिवसाची रात्र ठरली अखेरची रात्र..तरुणाचा निर्घृण खून

राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे यांच्यावर भोसरी एमआयडीसी येथील जमीन खरेदी प्रकरणी आरोप झाले आहे. या जमीन खरेदी प्रकरणी त्यांचे जावाई गिरीश चौधरी यांना ईडीने अटक झालेली आहे. तर एकनाथराव खडसे यांची ईडीने नऊ तास चौकशी केली असून त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांना चौकशी संर्दभात समस दिल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे एकनाथराव खडसे व त्यांच्या कुंटूबाभवती ईडी चौकशी फास वाढतच आहे. 'ईडी'च्या चौकशीनंतर आज (ता.१७) मुक्ताईनगर येथील त्यांच्या त्यांच्या फाॅर्म हाऊसवर ते आले. यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी त्यांची भेट घेवून त्यांच्याशी चर्चा केली.

हेही वाचा: शेतकऱ्यांना अनुदान वितरीत करा..अन्यथा बँकांवर पोलिस कारवाई

खडसेंचा बोलण्यास नकार..

प्रसार माध्यमांनी एकनाथरावर खडसें यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी यावर मात्र बोलण्यास नकार दिला. ईडीची चौकशी सुरू आहे. त्यामुळे यावर बोलणे सद्या उचीत होणार नसून चौकशी पूर्ण झाल्यावर मी बोलले असे त्यांनी सांगितले.

loading image