राष्ट्रवादी पक्षाची गांधीगिरी; खड्डेमय रस्त्यावरून जाणाऱयांना दिले गुलाबपुष्प ! 

भूषण श्रीखंडे
Wednesday, 2 December 2020

नागरिकांना गुलाबपुष्प देऊन सत्कार करून मनपा सत्ताधारी आणि प्रशासनाचा निषेध यावेळी व्यक्त करण्यात आला. 

जळगाव : जळगाव शहरातील रस्त्यांची वाट लागली असून काशिनाथ लॉज ते शेराचौक दरम्यानचा रस्ता अनेक वर्षांपासून अत्यंत खराब झाले आहे. याबाबत नागरिकांनी वेळोवेळी आंदोलने केल्यावरही या रस्त्याच्या कामाला मुहूर्त मिळत नसल्याने नागरिकांमध्येही संतापाचे वातावरण पाहायला मिळत आहे.  

रस्त्याच्या समस्या बाबत आज महापालिका दुर्लक्ष करत असून नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये यासाठी या रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांच्या सहनशीलता लक्षात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे त्यांना गुलाबपुष्प भेट देऊन त्यांचा सत्कार करून अनोखे आंदोलन केले. हे आंदोलन आज सकाळी जळगाव जिल्हा वक्ता प्रशिक्षण शहर जिल्हाध्यक्ष साहिल पटेल, यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.

गुलाब पुष्प देवून सत्कार

यावेळी नागरिकांसह येथील दुकानदार आणि रहिवाशी यांनी हा रस्ता त्वरित दुरुस्त करण्यात यावा अशी अपेक्षा व्यक्त केली. आज नागरिकांना गुलाबपुष्प देऊन सत्कार करून मनपा सत्ताधारी आणि प्रशासनाचा निषेध यावेळी व्यक्त करण्यात आला. 
 

आंदोलनात सहभागी 
या आंदोलनात अकील पटेल, मुजाहिद खान, मो. शफी पिंजारी , किरण चौधरी, गणेश सोनगिरे, संदीप काबरा , आझाद टेलर, शेख रफिक शेख युसूफ, शरद बोरसे, दीपक गंगराळे , ताहेर पाटणवाला , मेहमूद शेख, गणेश निकम, मनोहर सपकाळे , कपिल महाजन , छोटू पटेल, काशिनाथ शिंदे , संजय अहिरे , विजय पाटील , मनोजकुमार,  वसीम सैय्यद यांच्यासह असंख्य कार्यकर्ते नागिरकांचा सहभाग होता .


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon NCP staged agitation on paved roads