नवीन लागवड केलेल्या केळीवर आता...कुक्कूंबर मोझॅक व्हायरसचे संकट! 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 जुलै 2020

जून महिन्यात तीन वेळा वादळी पावसाने रावेर तालुक्‍यातील 900 हेक्‍टरवरील केळी जमिन दोस्त झाली होती. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले होते.

जळगाव ः मागिल महिन्यात तीन वेळा वादळी पावसाच्या तडाख्याने केळीबागांवर मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. शेतकऱ्यांनी नविन लागवगड केलेल्या केळीबागांवर आता नविन संकट आले असून हे संकट आता आस्मानी नसून एका व्हायरसचे आहे. नविन केळीच्या खोडावर कुक्कूंबर मोझॅक व्हायरस (सीएमव्ही) याचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. 

जून महिन्यात तीन वेळा वादळी पावसाने रावेर तालुक्‍यातील 900 हेक्‍टरवरील केळी जमिन दोस्त झाली होती. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले होते. हवामानावरील आधारीत फळपीक विमा योजनेचा केळी उत्पादकांना नियम अटी, शर्थी मुळे काहीच फायदा झाला नव्हता. त्यामुळे रावेर तालुक्‍यातील 35 गावांमधील 900 हेक्‍टर वरील 75 कोटी रुपयांच्या केळी पिकांचे नुकसान झाले होते. या संकटातून शेतकरी सावरत असतांना नविन लागवड केलेल्या केळी पिकांवर आता कुक्कूंबर मोझॅक व्हायरसचा प्रार्दुभाव पिकांवर पडू लागला आहे. विवरे बुद्रकू येथील केळी बागातील सात खोडांवर याचा प्रादुर्भाव पडल्याचे प्रथम दिसून आले. 

संकट उंबरठ्यावर 
यावल व रावरे तालुक्‍यातील केळीबाग शेतकऱ्यांवर या नव्या संकटाचे प्रमाण कमी असले तरी रावेर तालुक्‍यातील विवरे बुद्रुक येथे केळीबागावर या व्हायरसचा प्रादुर्भाव आढळून आला. त्यामुळे केळीबागांवर नव्या संकट आले असून शेतीच्या बांध्यावरील वाढलेले तण व वेलवर्गीय पिकांमूळे रसशोषक किडींचा प्रादुर्भाव वाढून या विषांणूचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे दिसून येत आहे.  

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon newly planted bananas Crisis of Cucumber Mosaic Virus