esakal | दिलासा..रोजच्या कोरोना बाधितांचा आलेख स्थिर

बोलून बातमी शोधा

corona
दिलासा..रोजच्या कोरोना बाधितांचा आलेख स्थिर
sakal_logo
By
टिम इ सकाळ

जळगाव : जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून नव्या बाधितांची रोजची संख्या स्थिर असून कोरोनाचा आलेख ‘फ्लॅट’ झाल्याची दिलासादायक बाब समोर आली आहे. विशेष म्हणजे बरे होणाऱ्यांची संख्याही तेवढीच किंवा त्यापेक्षाही अधिक आहे. मात्र, शुक्रवारी आणखी २१ जणांचा बळी गेला असून त्यात एकट्या एरंडोल तालुक्यातील ७ जणांचा समावेश आहे.

जळगाव जिल्ह्यात फेब्रुवारीच्या पंधरवड्यानंतर रुग्णसंख्या वाढू लागली. मार्च, एप्रिलमध्ये रुग्णसंख्येने कहर केला. दररोज हजार, बाराशेवर रुग्ण समोर येताना आढळून येत आहेत. असे असले तरी गेल्या आठवड्यापासून दररोज समोर येणाऱ्या रुग्णांची संख्या हजाराच्या आसपास स्थिर आहे.

११ हजार चाचण्या

शुक्रवारी तब्बल १० हजार ९६६ चाचण्यांचे अहवाल प्राप्त झाले. पैकी १०४८ रुग्ण आढळून आल्यानंतर एकूण रुग्णसंख्या १ लाख १४ हजार ७५२ झाली. तर दिवसभरात १०३० रुग्ण बरेही झाले. बरे होणाऱ्यांचा आकडा १ लाख १ हजार ७८८ वर पोचला आहे. जिल्यातील मृत्युदर अद्यापही चिंतेची बाब आहे. गेल्या २४ तासांत आणखी २१ रुग्णांचा बळी गेला. त्यामुळे बळींचा आकडा २०३७ झाला आहे.

जळगावात दिलासा

गेल्या काही दिवसांपासून जळगाव शहराला दिलासा मिळाला आहे. शुक्रवारी शहरात २०४ नवे रुग्ण आढळून आले. विशेष म्हणजे दिवभरात तब्बल २८५ रुग्ण बरे झाले.

अन्य ठिकाणचे रुग्ण असे

जळगाव ग्रामीण २८, भुसावळ ९०, अमळनेर ८०, चोपडा ८४, पाचोरा ५३, भडगाव २८, धरणगाव ३४, यावल ३७, एरंडोल २०, जामनेर १०५, रावेर ९७, पारोळा ४६, चाळीसगाव ५०, बोदवड २६, मुक्ताईनगर ३१, अन्य जिल्ह्यातील ३१.