esakal | मुलीला फूस लावून पळविले; विवाह झाल्‍याचे दर्शविले अन्‌

बोलून बातमी शोधा

girl torture

मुलीला फूस लावून पळविले; विवाह झाल्‍याचे दर्शविले अन्‌

sakal_logo
By
टिम इ सकाळ

निंभोरी (ता. पाचोरा) : आदिवासी समाजातील अल्‍पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेले. इतकेच नाही तर गावात तिच्‍यासोबत विवाह झाल्‍याचे दर्शविले. यानंतर त्‍या मुलीसोबत संबंध प्रस्‍थापित केले. या प्रकरणाचे भिंग फुटल्‍यानंतर संशयीतास पोलिसांनी ताब्‍यात घेतले आहे.

सातगाव (डोंगरी) (ता. पाचोरा) येथे आदिवासी समाजातील अल्पवयीन मुलीस फूस लावून पळविल्यानंतर जामनेर येथील मंदिरावर विवाह केल्याचे दर्शवून त्याच दिवशी शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याप्रकरणी पिंपळगाव हरेश्‍वर पोलिस ठाण्यात संशयिताविरुद्ध बलात्कार, फूस लावून पळविणे व अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात अल्पवयीन मुलगी व संशयित या दोघांना जामनेर येथून ताब्यात घेण्यात आले असून, संशयिताला २३ पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

भाड्याची खोली करून राहू लागले

सातगाव (डोंगरी) (ता. पाचोरा) येथील अमोल नाशिकराव पाटील या युवकाने येथील आदिवासी तडवी समाजातील दहावीत शिक्षण घेत असलेल्या १६ वर्षे सहा महिने वय असलेल्या युवतीस १३ एप्रिलला मध्यरात्री फूस लावून पळविले होते. दरम्यान, दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी जामनेर येथे मंदिरात जाऊन माळा घालून विवाह केला व त्याच दिवशी जामनेर येथे भाड्याची खोली करून राहू लागले.

आईची तक्रार संशयीत ताब्‍यात

पोलिसांना प्रेमीयुगुल जामनेर येथे असल्याचा सुगावा लागल्याने सहाय्यक पोलिस निरीक्षक नीता कायटे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार डिगंबर थोरात, हवालदार शिवनारायण देशमुख, रवींद्र पाटील, शैलेश चव्हाण महिला कर्मचारी योगिता चौधरी यांनी दोघांना ताब्यात घेऊन पिंपळगाव हरेश्‍वर येथे आणले व मुलीच्या जबाबानुसार आणि तिच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून बलात्कार, अॅट्रॉसिटी व अपहरणाचा गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस उपअधीक्षक भारत काकडे तपास करीत आहेत.