esakal | पत्‍नीलाच म्‍हणाला दुसरे लग्‍न करायचेय; दुसरा विवाह करताच पत्‍नीने घेतला निर्णय
sakal

बोलून बातमी शोधा

police fir

पत्‍नीलाच म्‍हणाला दुसरे लग्‍न करायचेय; दुसरा विवाह करताच पत्‍नीने घेतला असा निर्णय

sakal_logo
By
टीम ई सकाळ

जळगाव : लग्न झालेले असतानाही पतीने महिला वाहकाशी अनैतिक संबंध (Immoral relations) ठेवले. संबंधित महिला वाहकाशी दुसरे लग्न करता यावे म्हणून पतीने पत्नीचा शारीरिक, मानसिक छळ केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेप्रकरणी विवाहितेच्या फिर्यादीवरून पती अनिल बागूल (रा. ब्राह्मणे, ता. एरंडोल) यांच्यासह महिलेविरुद्ध तालुका पोलिस (police case) ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. (Married to a even while married)

विवाहितेने पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार शिंदखेडा तालुक्यातील बेटावद येथील मनीषा हिचा २२ मे २०१५ ला एरंडोल तालुक्यातील अनिल यांच्याशी विवाह झाला. लग्नानंतर त्यांना दोन मुलेही झाली. अनिल हे एशियन पेंट्स या कंपनीत नोकरी करतात. २०१६ मध्ये एरंडोलला राहत असताना पती अनिल यांचा बस वाहक असलेल्या महिलेशी ओळख झाली.

हेही वाचा: धक्कादायक प्रकार..काकाच्या घरात पुतण्याने रचला दरोड्याचा कट

भेटीगाठी वाढल्‍या अन्‌ पत्‍नीला शिवीगाळ

दोघांमध्ये भेटीगाठी वाढत अनिलने महिलेसोबत अनैतिक संबंध प्रस्थापित केले. यादरम्यान एक ते दोन वेळा महिलेला अनिल हा घरीही घेऊन आला. या अनैतिक संबंधांची माहिती मिळाल्यावर मनीषा हिने पती अनिल यास विचारले असता, अनिलने पत्नी मनीषा हीस शिवीगाळ करत मारहाण केली. तसेच यानंतर वारंवार घटस्फोट देण्याची धमकी देऊन मारहाण करायला लागला.

सासरच्‍यांकडून घेतले एक लाख

यादरम्यान पती अनिल याने मनीषा हिच्या माहेरून एक लाख रुपये घेतले. लग्नात मिळालेले सहा तोळे सोनेही अनिलकडे आहे. तसेच अनिल हा मनीषाच्या माहेरच्यांकडे वारंवार पैशाची मागणी करून त्यावरून मनीषा हीस मारहाण करून तिचा शारीरिक व मानसिक छळ केला.

हेही वाचा: जळगाव जिल्ह्यात संसर्गाची तीव्रता कमी,पण मृत्यूचे भय कायम !

पत्‍नीने दिली तक्रार

अनिल हा त्या महिलेस नेहमी लॉजवर घेऊन जाऊन तिच्यासोबत अनैतिक संबंध ठेवायचा. एके दिवशी अनिलने पत्नी मनीषा हीस मला दुसरे लग्न करायचे असून, फारकत देऊन टाक, असे सांगत मनीषा हिस मारहाण केली. गुरुवारी तालुका पोलिस ठाण्यात तक्रार दिली. यावरून अनिल बागूल व महिला वाहक या दोघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.