जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक सुरूच; आज 19 बाधितांचा मृत्यू 

जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक सुरूच; आज 19 बाधितांचा मृत्यू 
Updated on: 

जळगाव ः जळगाव जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा उद्रेक वाढत असून महापालिका व जिल्हा प्रशासन तसेच वैद्यकीय प्रशासन देखील हैरान झाले आहे. आज जळगाव जिल्ह्यात एक हजार ९८ नवे कोरोना बाधित आढळून आले आहे. यात जळगाव शहरात आज ३७० रुग्ण आढळून आले आहे.

जळगाव जिल्ह्यात कोरोना संसर्ग आजाराचा थैमान सुरूच असून दररोज रुग्णसंख्या वाढत आहे. त्यात जळगाव शहरात कोरोनाचा अधिक प्रभाव असून बाधितांची संख्या जळगाव शहरात अधिक आहे. जिल्ह्यातील संशयीत रुग्णांचे आज आलेल्या आहवाला जिल्ह्यात १ हजार ९८ जणांचे अहवाल पाॅझिटिव्ह आले आहे.  तर आज ७१८ जण कोरोना मुक्त होवून घरी गेले आहे तर कोरोनामूळे एकोनावीस जणांचा मृत्यू झाला आहे. 

जळगाव शहरात संसर्ग वाढतोय
जळगाव शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच आहे. महापालिका प्रशासनाकडून कारवाई करून सुध्दा शहरातील बाजार, मार्केट मधील दुकानांमध्ये काळजी घेत नसल्याचे दिसत आहे. तसेच रस्त्यावर नागरिक तोंडाला मास्क न लावणे, सुरक्षेचा उपायोजना करत नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे जळगाव शहरातील कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे.

असे आढळले आज बाधित
जळगाव शहर- ३७०, जळगाव ग्रामीण- ५१, भुसावळ-७४, अमळनेर-१०६, चोपडा-१०७, पाचोरा-४६, भडगाव-११, धरणगाव- ५१, यावल-२३, एरंडोल-३९, जामनेर-१२, रावेर-७१, पारोळा- १८, चाळीसगाव-७२, मुक्ताईनगर-२९, बोदवड-१४, इतर १४ असे रुग्ण आढळून आले आहे.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Nandurbar bribery case
Jalgaon Engineer Incident
Jalgaon Mother and Son Case
Girna Dam Water Storage
Marathi News Esakal
www.esakal.com