जिल्ह्यात कोरोना बाधितांचा मृत्य सत्र सुरूच; १९ जणांचा बळी 

सचिन जोशी
Wednesday, 16 September 2020

बळींची संख्या १०२७वर पोचली.नव्या ७४३ बाधितांसह एकूण रुग्णसंख्या ४० हजार ९०८ झाली, तर दिवसभरात ७२३ रुग्ण बरे झाल्याने हा आकडाही २९ हजार ८९१ झाला.

जळगाव  : जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूचे सत्र सुरुच आहे. गेल्या २४ तासांत पुन्हा १९ रुग्णांचा बळी गेला. तर दिवसभरात ७४३ नवे बाधित रुग्ण आढळून आले. नव्या रुग्णांच्या बरोबरीने बरे होणाऱ्यांची संख्याही वाढतेय. आज ७२३ रुग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले, त्यामुळे बरे होणाऱ्यांची संख्याही ३० हजारांच्या टप्प्यात आहे. 

जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढतोय. नव्या बाधितांच्या संख्येच्या तुलनेत आता बरे होणाऱ्यांची संख्याही वाढत असून ही दिलासादायक बाब असली तरी जिल्ह्यातील मृत्यूचे सत्र अद्याप कमी व्हायला तयार नाही. गेल्या पाच-सहा दिवसांपासून दररोज पंधरापेक्षा अधिक रुग्णांचा मृत्यू होत असून गेल्या २४ तासांत पुन्हा १९ रुग्ण दगावले. त्यामुळे बळींची संख्या १०२७वर पोचली.नव्या ७४३ बाधितांसह एकूण रुग्णसंख्या ४० हजार ९०८ झाली, तर दिवसभरात ७२३ रुग्ण बरे झाल्याने हा आकडाही २९ हजार ८९१ झाला असून रिकव्हरीचे प्रमाण ७३ टक्क्यांवर पोचले आहे. 
 

जळगावात संसर्ग वाढताच 
जळगाव शहरात कोरोनाचा संसर्ग वाढतच आहे. दररोज शे-दीडशेपेक्षा अधिक रुग्ण आढळत आहेत. आज प्राप्त अहवालानुसार शहरात २०० रुग्ण आढळून आले, तर दिवसभरात १२६ रुग्णांना डिस्चार्जही मिळाला. गेल्या २४ तासांत शहरात पुन्हा चौघांचा मृत्यू झाला. 

असे आढळले रुग्ण 
जळगाव शहर २००, जळगाव ग्रामीण २५, भुसावळ ४३, अमळनेर ५६, चोपडा ६५, पाचोरा ४, भडगाव ४६, धरणगाव २३, यावल १४, एरंडोल ४७, जामनेर ६१, रावेर २७, पारोळा ३४, चाळीसगाव ६६, मुक्ताईनगर १६, बोदवड ९, अन्य जिल्ह्यातील ७. 

 

संपादन- भूषण श्रीखंडे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon number of deaths of corona infected patients is increasing in Jalgaon district.today nineteen people died