जळगाव जिल्ह्यात नविन कोरोना बाधितांची संख्या सातत्याने घटतेय !

सचिन जोशी
Wednesday, 28 October 2020

रुग्णसंख्या ५३ हजारांचा आकडा पार करुन गेली. तर १४३ रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे बरे झालेल्यांची संख्याही ५० हजार ७३४ झाली.

जळगाव : कोरोना संसर्गाचे प्रमाण सातत्याने घटत आहे. गेल्या दीड महिन्यापासून नव्या बाधितांचा आकडा घटत असून बरे होणाऱ्यांची संख्या दररोज अधिक असल्याचे दिसून येते. बुधवारी प्राप्त अहवालात नव्याने ८४ रुग्ण आढळून आले तर १४३ रुग्ण बरे झाले. दिवसभरात एकही मृत्यू झाला नाही, ही दिलासादायक बाब राहिली. 

जळगाव जिल्ह्यात कोरोनाच्या नव्या रुग्णांच्या आकड्यांचा आलेख सातत्याने कमी होतोय. १७ सप्टेंबरपासून नवे बाधित कमी व बरे होणारे रुग्ण अधिक असे रोजचे चित्र आहे. त्याची मालिका आजपर्यंत सुरुच असून बुधवारी प्राप्त दोन हजारांवर अहवालांपैकी ८७ नवे रुग्ण आढळले. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या ५३ हजारांचा आकडा पार करुन गेली. तर १४३ रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे बरे झालेल्यांची संख्याही ५० हजार ७३४ झाली असून रिकव्हरी रेट ९५.६६ टक्क्यांपर्यंत पोचला आहे. 

केवळ हजार ॲक्टिव रुग्ण 
सद्य:स्थितीत जिल्ह्यात लक्षणे असलेले ३४६ रुग्ण असून ६९४ रुग्णांना लक्षणे नाहीत. असे एकूण १०४० ॲक्टिव रुग्ण असून त्यातील ६३८ गृहविलगीकरणात आहेत. उर्वरित केवळ चारशे रुग्णांवर कोविड सेंटरमध्ये उपचार सुरु आहेत. 

असे आढळले रुग्ण 
जळगाव शहर २२, जळगाव ग्रामीण २, भुसावळ २१, अमळनेर ५, चोपडा ४, पाचोरा २, भडगाव १, धरणगाव ६, यावल १ ,जामनेर २, रावेर २, पारोळा ३, चाळीसगाव ६, मुक्ताईनगर १, बोदवड ४. 

 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon number of new corona cases in jalgaon district is continuously decreasing