जळगाव शहरात एक दिवस उशिरा पाणीपुरवठा; या दिवशी येणार या भागात पाणी

जळगाव शहरात एक दिवस उशिरा पाणीपुरवठा; या दिवशी येणार या भागात पाणी

जळगाव ः शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वाघूर जलवाहिनीला शिरसोली नाका ते काव्यरत्नावली चौकादरम्यान गळती लागली आहे. त्यामुळे जलवाहिनी गळतीचे काम महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने हाती घेतले आहे. त्यामुळे शहराचे पाणीपुरवठा वेळापत्रक एक दिवस पुढे ढकलले गेले असून, शनिवार (ता. ३)चा पाणीपुरवठा रविवारी (ता. ४), तर रविवारचा पाणीपुरवठा सोमवारी (ता. ५) व मंगळवारी (ता. ६) होणार आहे, असे शहर अभियंत्यांनी सांगितले आहे. 

जळगाव शहराला वाघूर धरणावरून जलवाहिनीद्वारे पाणीपुरवठा केला जातो. या मुख्य बाराशे मिलिमीटर व्यासाच्या जलवाहिनीला नेरी नाका ते काव्यरत्नावली चौकादरम्यान शुक्रवारी गळती लागली. दुरुस्तीचे काम दुपारी सुरू करण्यात आले, तसेच वाघूर धरणावरील सबस्टेशनमधील दुरुस्तीचे कामदेखील पाणीपुरवठा विभागाने हाती घेतले आहे. त्यामुळे शहराचा पाणीपुरवठा एक दिवस पुढे ढकलला असून, पाणीपुरवठा वेळापत्रकात बदल करण्यात आला. शनिवारी शहरातील मेहरूण, अयोध्यानगर परिसर, खेडी, योगेश्‍वरनगर परिसराचा पाणीपुरवठा नियमित होणार आहे. 
 

असे आहे पाणीपुरवठा वेळापत्रक 

रविवारी या भागात होणार पाणीपुरवठा 
वाल्मीकनगर, कांचननगर, दिनकरनगर, असोदा रोड परिसर, नित्यानंदनगर टाकी परिसरातील मोहननगर, नेहरूनगर परिसर, खंडेरावनगर परिसरातील हरिविठ्ठलनगर, पिंप्राळा गावठाण परिसर, गायत्रीनगर, नूतन वर्षा कॉलनी, शारदा कॉलनी. मानराज टाकीवरील दांडेकरनगर, मानराज पार्क, निसर्ग कॉलनी, खोटेनगर टाकीवरील भाग - द्रौपदीनगर, मुक्ताईनगर, धनश्रीनगर, पोलिस कॉलनी परिसर, खोटेनगर, गेंदालाल मिल टाकीवरील- शिवाजीनगर हुडको, प्रजापतनगर, एस.एम.आय.टी. परिसर, डायरेक्ट, योगेश्‍वरनगर, हिरा पाइप, शंकररावनगर, खेडीगाव परिसर. डी.एस.पी. टाकी- तांबापुरा, गणपतीनगर, आदर्शनगर व इतर परिसर शिवकॉलनी, विद्युत कॉलनी, राका पार्क, पोस्टल कॉलनी, विवेकानंदनगर व इतर भाग. अयोध्यानगर पहिला दिवस- गृहकुल, म्हाडा कॉलनी, रायसोनी शाळा परिसर, अजिंठा हाउसिंग सोसायटी, जगवानीनगर, मेहरूण पहिला दिवस- सदाशिवनगर, रामनगर, रजा कॉलनी, आक्सानगर, गणेशपुरी, मलिकनगर. 

सोमवारी या भागात होणार पाणीपुरवठा 
खंडेरावनगर दुसरा दिवस- पिंप्राळा गावठाण उर्वरित भाग, पिंप्राळा हुडको, सेंट्रल बँक कॉलनी, आशाबाबानगर, पिंप्राळा टाकी मानराज टाकी दुसरा दिवस- शिंदेनगर, अष्टभुजा, वाटिका आश्रम परिसरातील राहिलेला भाग. खोटेनगर टाकीवरील राहिलेला भाग- निवृत्तीनगर, कल्याणीनगर, दादावाडी, हिराशिवा कॉलनी, आहुजानगर, निमखेडी राहिलेला भाग. नित्यानंद टाकी दुसरा दिवस- नित्यानंदनगर, संभाजीनगर, रायसोनीनगर, समतानगर परिसरातील उर्वरित भाग. डीएसपी बायपास- तांबापुरा, श्यामा फायरसमोरील परिसर. डीएसपी टाकीवरून- जिल्हा रोड, रामदास कॉलनी, शारदा कॉलनी, महाबळ कॉलनी परिसर, नूतन वर्षा, चैत्रवन कॉलनी, आनंदनदर, तिवारीनगर, बाहेती शाळा आदी. गिरणा टाकीवरील उंच टाकी- भगवाननगर, कोल्हेनगर, अंबिका सोसासयटी, शिवकॉलनी आदी परिसर. मेहरूण भागातील परिसर मेहरूण गावठाण, दत्तनगर, लक्ष्मीनगर, इक्बाल कॉलनी, एकनाथनगर, मंगलपुरी परिसर. अयोध्यानगर दुसरा दिवस- सद्‌गुरूनगर, हनुमाननगर, लीला पार्क, गौरव हॉटेल. 

मंगळवारी या भागात होणार पाणीपुरवठा 
नटराज टाकी ते चौघुल मळ्यापर्यंतचा भाग, भवानी पेठ, बळिराम पेठ, नवी पेठ, हाउसिंग सोसायटी शाहूनगर, प्रतापनगर, गेंदालाल मिल टाकीवरील भाग-खडके चाळ, इंद्रप्रस्थनगर, के.सी. पार्क, गेंदालाल मिल, हुडको. रिंग रोड परिसर पूर्ण, भोईटेनगर, भिकमचंद जैननगर. आकाशवाणी टाकीवरील- जुनेगाव, सिंधी कॉलनी, इंडिया गॅरेज, ओंकारनगर, जोशी पेठ. हेमुकलाणी टाकीवरील परिसर- गणेशवाडी, कासमवाडी, सम्राट कॉलनी, ईश्‍वर कॉलनी, वर्षा कॉलनी व इतर परिसर. सुप्रीम कॉलनी परिसर, डीएसपी टाकीवरील साने गुरुजी कॉलनी, पार्वतीनगर, शिवरामनगर, यशवंतनगर परिसरातील उर्वरित भाग, श्रद्धा कॉलनी, नंदनवननगर, चर्च रोड. १५ इंची व्हॉल्व्ह- प्रभाग कॉलनी, ब्रुकबॉन्ड कॉलनी, गिरणा टाकी आवारातील उंच टाकीवरून वाघनगर, हरिविठ्ठलनगर, गणेश कॉलनी, श्रीकृष्ण कॉलनी परिसर, नित्यानंद टाकीवरून- समतानगर, स्टेट बँक कॉलनी, धांडेनगर आदी.  

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com