esakal | तब्बल..११३ दिवसानंतर जळगावची कोरोना रुग्ण संख्या शंभरीच्या आत !
sakal

बोलून बातमी शोधा

corona

तब्बल..११३ दिवसानंतर जळगावची कोरोना रुग्ण संख्या शंभरीच्या आत !

sakal_logo
By
टीम ई सकाळ

जळगाव : जिल्ह्यात तब्बल ११३ दिवसांनी रोजच्या नवीन कोरोना (corona) बाधितांचा आकडा शंभराच्या आत नोंदला गेला असून ही जिल्ह्यातील संसर्गाच्या दृष्टीने दिलासादायक बाब आहे. गुरुवारी केवळ ८० रुग्णांची नोंद झाली, तर त्यापेक्षा तिप्पट म्हणजे २५२ रुग्ण (patient) बरे झाले. दिवसभरात केवळ एका रुग्णाचा मृत्यू (Death) झाल्याची नोंद आहे.
(one hundred and thirteen days after jalgaon corona patients number less one hundred)

हेही वाचा: जळगाव जिल्ह्यात लसीकरणाला वेग;साडेपाच लाखांवर लशीचे दिले डोस

जळगाव जिल्ह्यात मे व जून महिन्यात कोरोनाचा संसर्ग (Corona infection) बऱ्यापैकी नियंत्रणात येत असल्याची चिन्हे आहेत. दीड महिन्यापासून सातत्याने रुग्णसंख्या घटत असून मृत्यूदरही कमी होत आहे. गुरुवारी ५ हजार ३०० चाचण्यांचे अहवाल प्राप्त झाले. पैकी ८० नवीन बाधित समोर आले तर २५२ रुग्ण बरे झाले. जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या १ लाख ४१ हजार २८९ झाली असून बरे होणाऱ्यांचा आकडा १ लाख ३६ हजार ४४२वर पोचला आहे. एका मृत्यूसह बळींची एकूण संख्याही २५५९ झाली आहे.

तीन महिन्यांनी शंभराहून कमी
जिल्ह्यात फेब्रुवारीच्या पंधरवड्यानंतर कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढू लागला होता. याआधी १७ फेब्रुवारीला जिल्ह्यात ६९ रुग्णांची नोंद झाली होती. नंतर तब्बल साडेतीन महिन्यांनंतर शंभराच्या आत दैनंदिन रुग्ण नोंदले गेले आहेत.

corona

corona

जळगाव शहर नियंत्रणात
सर्वाधिक रुग्णसंख्या व बळी नोंदल्या गेलेल्या जळगाव शहराला मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या काही दिवसांपासून जळगाव शहरातील रुग्णसंख्या नियंत्रणात येत असून बरे होणारे वाढत आहेत. शहरात गुरुवारी अवघ्या ५ नव्या रुग्णांची नोंद झाली. शहरातील सक्रिय रुग्ण आता दोनशेच्या टप्प्यात आहेत.

हेही वाचा: जिल्हाधिकाऱ्यांनी शिवाजीनगर पुलाचे काम पूर्ण करण्याचा दिला 'अल्टिमेंटम'

अन्य ठिकाणी असे आढळले रुग्ण

जळगाव ग्रामीण १०, भुसावळ व पारोळा तालुका प्रत्येकी ६, अमळनेर व भडगाव प्रत्येकी ४, चोपडा व जामनेर प्रत्येकी ३, पाचोरा ७, यावल १, एरंडोल २, जामनेर ३, रावेर २, चाळीसगाव २४, बोदवड १. धरणगाव व मुक्ताईनगर तालुक्यात एकही रुग्णाची नोंद नाही.

लसीकरणाची स्थिती
जिल्ह्यातील विविध केंद्रांवर गुरुवारी ३८३० जणांना पहिला डोस तर ५०० लाभार्थींना लशीचा दुसरा डोस देण्यात आला. शुक्रवारीही बहुतांश केंद्रांवर लसीकरण सुरु राहणार आहे. त्यासाठी या सर्व केंद्रांवर कोविशील्डचे १२ हजार १७० तर कोव्हॅक्सीनचे ८९० डोस उपलब्ध आहेत.

loading image