जिल्ह्यातील "कोरोना'ग्रस्तांच्या मृत्यूचे तांडव सुरूच! 

जिल्ह्यातील "कोरोना'ग्रस्तांच्या मृत्यूचे तांडव सुरूच! 
Updated on

जळगाव  : जिल्ह्यात "कोरोना'बाधितांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. त्याच तुलनेत जिल्ह्यातील "कोरोना'बाधितांच्या मृत्यूचे प्रमाणही वाढत आहे. आजपर्यंत जिल्ह्यात 155 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आरोग्यमंत्र्यांनी सूचना दिल्यानंतरही जिल्ह्यात मृत्यूचे तांडव सुरूच असल्याने जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेवर निर्माण झालेले प्रश्‍नचिन्ह कायम आहे.
 
जिल्ह्याचा मृत्यूदर सुरवातीपासून सर्वाधिक आहे. राज्याच्या तुलनेत जिल्ह्यातील मृत्यूदराचे प्रमाण चारपट अधिक असल्याची कबुली आरोग्यमंत्री राजेश यांनी जळगाव जिल्हा दौऱ्यावर असताना दिली होती. यानंतर टोपे यांनी आरोग्य यंत्रणेच्या त्रुटी व समस्या जाणून घेतल्या. त्यानंतर शासकीय वैद्यकीय रुग्णालयात आरोग्य यंत्रणा बळकट करण्यासाठी टोपे यांनी 16 डॉक्‍टर व 25 परिचारिकांची नियुक्तीही करण्यात आली आहे. मात्र त्यानंतरही जिल्ह्यात दररोज मृत्यू होणाऱ्यांची संख्या वाढतच आहे. यात आजपर्यंत जिल्ह्यात 155 रुग्णांचा मृत्यू झाला असल्याने असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. 

यंत्रणा वाढवूनही मृत्यूदर तोच! 
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत आरोग्य यंत्रणा तोकडी असल्यामुळे मृत्यू होत असल्याचा अहवाल शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे तत्कालीन अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे यांनी दिला होता. त्यानुसार तत्काळ टोपे यांनी वैद्यकीय महाविद्यालयात 16 तज्ज्ञ डॉक्‍टरांसह 25 परिचारिकांची टीम पाठविली असल्याने आता पुरेशी यंत्रणा रुग्णालयात दाखल झाली आहे. मात्र, तरीही दररोज रुग्णांचा मृत्यू होत असल्याने आता आरोग्य यंत्रणेवरच प्रश्‍न उपस्थित होऊ लागला आहे. 

नऊ दिवसांत 31 मृत्यू 
संपूर्ण जिल्ह्यातून "कोरोना'चे रुग्ण कोविड रुग्णालयात दाखल होत आहेत. गेल्या नऊ दिवसांत "कोरोना'ग्रस्तांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले असून नऊ दिवसांत जिल्हाभरात "कोरोना'ग्रस्त असलेल्या तब्बल 31 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात अशीच परिस्थिती कायम राहिल्यास राज्यात देशात मृत्यूदराबाबत जळगाव जिल्हा अव्वलस्थानी येण्याची शक्‍यता नाकारता येणार नाही. 


नऊ दिवसांतील मृत्यू असे 
तारीख मृतांची संख्या
 
10 जून 4 
11 जून 0 
12 जून 5 
13 जून 3 
14 जून 5 
15 जून 2 
16 जून 6 
17 जून 2 
18 जून 4 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Nandurbar bribery case
Jalgaon Engineer Incident
Jalgaon Mother and Son Case
Girna Dam Water Storage
Marathi News Esakal
www.esakal.com