३८ हजार बेशिस्त वाहन चालकांना एक कोटींचा दंड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

३८ हजार बेशिस्त वाहन चालकांना एक कोटींचा दंड

३८ हजार बेशिस्त वाहन चालकांना एक कोटींचा दंड

जळगाव : जिल्ह्यात कोरोना संसर्गामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना लागू करण्यात आल्या. मात्र मार्च ते मे दरम्यान प्रतिबंधात्मक उपाय योजनांचे पालन न केल्याने ३८ हजार ३७५ बेशिस्त वाहनचालक, संस्था, मंगल कार्यालये, लॉन्स, आस्थापना, नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. या कारवाईपोटी १ कोटी ५२ लाख ३२ हजार ६२८ रूपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. (jalgaon-police-action-vehical-not-follow-rules-and-punished)

हेही वाचा: ओबीसी आरक्षणावरुन भाजप-काँग्रेस आमने सामने

मार्च ते मे २०२१ दरम्यान संसर्गकाळात शहरासह अन्य ठिकाणी वाहनचालकांकडून नियमांचे उल्लंघन करण्यात आले. पोलीस प्रशासन, वाहतूक शाखेकडून विना हेल्मेट, विना सिटबेल्ट वाहन चालविणे, ट्रीपलसिट विना नंबरप्लेट, ओव्हरस्पिड, चालवितांना मोबाईलच वाहन वापर, विना परवाना वाहन चालविणे, नो पार्कींगसह वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याने दंडात्मक कारवाई झाली. मास्कचा वापर न करणे, सार्वजनिक जागी थुंकणे, वेळेचे बंधन न पाळणे अशा विविध कारणाने प्रशासनाकडून ३८ हजार ३७५ कारवाई करण्यात आल्या. यात १ कोटी ५२ लाख ३२ हजार ६२८ रूपये दंडादाखल वसूल करण्यात आले.

नो मास्क नो एन्ट्री

जिल्हाधिकारी कार्यालयासह अन्य कार्यालयात आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत 'नो मास्क नो एन्ट्री' सह अन्य नियमांची सक्ती आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची थर्मल गन, पल्स ऑक्सीमिटरव्दारे तपासणीसह संपर्क मोबाईल क्रमांकाची नोंद करूनच प्रवेश दिला जात आहे. नागरिकांनी घराबाहेर पडतांना मास्कसह अन्य सुरक्षा साधनांचा वापर करीत आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी राहूल पाटील यांनी दिली.

Web Title: Marathi News Jalgaon Police Action Vehical Not Follow Rules And

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..