अतिप्रसंगाचा गुन्‍हा तरी रात्री पुन्हा ‘तिच्या’ घरात

atyachar
atyachar
Updated on

जळगाव : दीक्षितवाडी भागातील पंचवीस वर्षीय गृहिणी दोन मुलींसह घरात एकटी असताना तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न झाला. तिचा प्रतिकार आणि शेजाऱ्यांच्या मदतीने संशयिताने पळ काढला. पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाल्यावर रात्री पुन्हा संशयित तिच्या घरी आल्याने गल्लीतील तरुणांनी त्याला पकडून चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले. 

शहरातील दिक्षित वाडी परिसरात सदरची घटना घडली. पतीचे मानसिक संतुलन ठीक नसल्याने औरंगाबाद रुग्णालयात दाखल असल्याने पंचवीस वर्षीय गृहिणी मण्यांची पोत बनविण्याचे काम करून उदरनिर्वाह चालविते. कोरोना असला तरी पोटाचा उदरनिर्वाह भागविण्यासाठी पोता गुंफून विक्रीचे काम महिला करत असते. अशात शनिवारी (५ सप्टेंबर) रात्री दहाच्या सुमारास महिला घरात असताना निलेश किशनलाल परिहार हा तिच्या घरात शिरला. त्याने तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा प्रतिकार करून आरडाओरड केल्याने शेजाऱ्यांनी मदतीला धाव घेत त्‍याला बाहेर काढले. निलेश हा सदर महिलेचा नातेवाईक असल्‍याचे सांगितले जात आहे.

गुन्हा दाखल तरीही...
सदर प्रकाराबाबत निलेश परिहार याच्याविरूद्ध जिल्‍हापेठ पेालिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आल होता. पोलिसात गुन्हा दाखल करताना त्याच रात्री साडेदहाच्या सुमारास निलेश पुन्हा पीडितेच्या घरी धडकला. त्याच्या पाळतीवर असलेल्या गल्लीतील तरुणांना चाहूल लागताच त्याला पकडून चांगलाच चोप दिला आणि जिल्‍हापेठ पेालिसांच्या स्वाधीन करण्यात आले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Nandurbar bribery case
Jalgaon Engineer Incident
Jalgaon Mother and Son Case
Girna Dam Water Storage
Marathi News Esakal
www.esakal.com