"पीएसआय'सह पोलिस कर्मचारी "पॉझिटिव्ह'; शहरात 23 नवे रुग्ण 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जून 2020

गेल्या महिनाभरापूर्वी एमआयडीसी पोलिस ठाण्यातील डीबीतील एक कर्मचारी बाधित आढळून आला होता. ​

जळगाव  : दिवसरात्र ड्यूटी करणारे पोलिस देखील "कोरोना'च्या विळख्यात सापडत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी एमआयडीसी पोलिस ठाण्यातील पोलिस निरीक्षकाचा अहवाल "पॉझिटिव्ह' आला आहे. त्यांच्या संपर्कात आलेल्यांना क्‍वारंटाईन करण्यात आले होते. आज त्यांचा अहवाल प्राप्त झाला असून, यामध्ये पोलिस उपनिरीक्षकासह एका कर्मचाऱ्याचा समावेश आहे. पोलिस ठाण्यातील चार जण "पॉझिटिव्ह' आल्याने पोलिसांमध्ये देखील आता भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

शहरात आज "कोरोना'चे नवे 23 बाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे शहरातील बाधितांची संख्या ही 728 इतकी झाली आहे. गेल्या महिनाभरापूर्वी एमआयडीसी पोलिस ठाण्यातील डीबीतील एक कर्मचारी बाधित आढळून आला होता. हा कर्मचारी बरा होऊन ड्यूटीवर हजर झाला. त्यानंतर आता दोन, तीन दिवसांपूर्वी याच पोलिस ठाण्यातील पोलिस निरीक्षकाला लागण झाली. त्यांच्या संपर्कात असलेल्यांना क्‍वारंटाईन करण्यात आले होते. यातील पोलिस उपनिरीक्षकासह एक कर्मचारी पॉझिटिव्ह आला आहे. 

याठिकाणी आढळले रुग्ण 
शहरात आज तानाजी मालुसरेनगर 2, कांचननगर 2, चौघुले प्लॉट 2, मेहरुण परिसरातील दत्तनगर, मकरंद कॉलनी, श्रीकृष्ण हाईट्‌स (प्रेमनगर), विवेकानंदनगर, द्वारकानगर, सुरेशदादा जैननगर, आदर्शनगर, मयूर कॉलनी, मू. जे. महाविद्यालय परिसर या ठिकाणावरील प्रत्येकी एक असे एकूण 23 नवे रुग्ण आढळून आले आहेत. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon "Police personnel with PSI" positive