"कोरोना'चे सावट पण... शैक्षणिक वर्षाची तयारी, साडेचार लाख पुस्तकांची मागणी ! 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 1 जून 2020

कोरोना व्हायरसचा राज्यातील आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. वाढता संसर्ग लक्षात घेता यंदा शाळा तसेच महाविद्यालय कधीपासून सुरू होणार याबाबत अनिश्‍चितता आहे.

जळगाव : "कोरोना'चे सावट उभे आहे. शाळा कधी सुरू होणार याबाबत अजूनही अनिश्‍चितता आहे. परंतु, नवीन शैक्षणिक वर्षाची तयारी म्हणून सर्वशिक्षा अभियानांतर्गत जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातर्फे जिल्ह्यातील पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी 4 लाख 54 हजार पाठ्यपुस्तकांची मागणी केली आहे. त्यानुसार पुस्तक येण्यास सुरवात झाली आहे. 

शासनाच्या सर्व शिक्षा अभियानांतर्गत जिल्हा परिषद, नगरपालिका व अनुदानित शाळांतील विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके पुरविली जातात. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून मराठी, उर्दू, हिंदी, सेमी इंग्रजी माध्यमातील पाठ्यपुस्तकांची मागणी करण्यात आली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही प्राथमिक शिक्षण विभागाकडून शैक्षणिक वर्षाची तयार सुरू आहे. गतवर्षी शालेय पटसंख्येनुसार यंदाच्या वर्षाकरिता पाठ्यपुस्तकांची मागणी करण्यात आली आहे. हे पुस्तक तालुकास्तरावर अर्थात पंचायत समिती कार्यालयाकडे थेट पाठविण्यास सुरवात झाली आहे. 

वाटपाबाबत अनिश्‍चितता 
कोरोना व्हायरसचा राज्यातील आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. वाढता संसर्ग लक्षात घेता यंदा शाळा तसेच महाविद्यालय कधीपासून सुरू होणार याबाबत अनिश्‍चितता आहे. परंतु, पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी सर्व शिक्षा अभियानांतर्गत मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात येत असते. त्याचे करून पुस्तक मागविण्यात आली आहेत. मात्र कोरोनामुळे शाळा कधी सुरू होणार याबाबत निश्‍चित नसल्याने पुस्तक वाटपाचे देखील अनिश्‍चितच आहे. 

पुस्तकांची तालुकानिहाय मागणी (पहिली ते आठवी) 
तालुका.............पुस्तकांची मागणी 
अमळनेर......... 32,394 
भडगाव.......... 19,923 
भुसावळ.......... 31,104 
बोदवड........... 11,184 
चाळीसगाव....... 58,753 
चोपडा............ 41,422 
धरणगाव.......... 19,433 
एरंडोल............ 19,563 
जळगाव........... 23,798 
जामनेर............. 48,860 
मुक्ताईनगर........ 19,854 
पाचोरा............. 37,141 
पारोळा............. 23,901 
रावेर............... 36,127 
यावल.............. 30,663 
एकूण............... 4,54,120 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon preparations for the academic year demand for four and a half lakh books