
नागरिकांनी महापालिकेच्या तसेच समाजीक संस्थांनी सुरू केलेल्या मुर्ती संकलन केंद्रात दान करण्यापूर्वी तसेच घरुनच धार्मिक विधी करावी.
जळगाव ः गणेशोत्सवाला प्रारंभ झाला असून पाचव्या आणि शेवटच्या दिवसाच्या गणपतीचे विर्सजन करण्याला सुरवात झाली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा गणेश उत्सवार मर्यादा आणली असून मेहरुण दरवर्षी विसर्जन गर्दी लक्षात जळगाव महापालिकेने ही गर्दी टाळण्यासाठी यंदा २६ ठिकाणी मुर्ती संकलन केंद्र तयार केले आहे.
जळगाव शहरात कोरोना बाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. त्यात गणेश उत्सव सुरू झाला असून सार्वजनीक गणेश उत्सव तसेच मिरवणूकीवर बंदी घातलेली आहे. त्यात गणेश विर्सजनाची मेहरुण तलावारील गर्दी टाळण्यासाठी जळगाव महापालिकने शहरात २६ ठिकाणी गणेश मुर्ती संकलन केंद्र शहरातील विविध भागात तयार करणार आहे. केले आहे. त्यानुसार कोरोना पाचव्या व शेवटच्या दिवसच्या गणपती विर्सजनासाठी हे केंद्र सुरू केली जाणार आहे. नागरिकांनी केंद्रात दाण केलेले मुर्तींचे विधिवत पद्धतीने महापालिका प्रशासन विर्सजन करणार आहे.
येथे असणार मुर्ती संकलन केंद्र, केंद्र प्रमुख
मनपा शाळा क्र. १, शिवाजी नगर- सुनील तायडे, व. वा. वाचनालय, नवि पेठ- मनिष अमृतकर, सानेगुरुजी वाचनालय- रमेश कांबळे, गुजराठी समाज कार्यालय, रिंगरोड- सुरेश भालेराव, हटकर समाज मंगल कार्यालय, मोहाडी रोड- लोमेश धांडे, अंजिठा लॉन, कृआबा समोर-के. के. बडगुजर, हतनुर कॉलनी मंगल कार्यालय, महाबळ रोड-कुणाल बोरसे, मनपा शाळा क्र. २१ वाल्मिक नगर- मंजूर खान, मनपा शाळा पांझरपोळा चौक- अविनाश कोल्हे, सिंधी कॉलनी वालेचा शाळा- नागेश लोखंडे, जितेंद्र किरंगे, अयोध्या नगर कासार मंगल कार्यालय- श्यामकांत भांडारकर, मनपा लाठी शाळा ढाकेवाडी- जितेंद्र रंधे, का. ऊ. कोल्हे विद्यालय- प्रसाद पुराणिक, मेहरुण गावठाण- विजय मराठे, सोमाणी मार्केट मागील निमर्डी शाळा, पिंप्राळा चौक- जयंत शिरसाठ, झोरास्ट्रियन हॉल, गिरणा टाकी समोर- नरेंद्र जावळे, शानबाग हॉल, प्रभात कॉलनी-मिलींद जगताप, रोटरी हॉल मायादेवी नगर- उल्हास इंगळे.
घरुनच धार्मिक विधी करावी
नागरिकांनी महापालिकेच्या तसेच समाजीक संस्थांनी सुरू केलेल्या मुर्ती संकलन केंद्रात दान करण्यापूर्वी तसेच घरुनच धार्मिक विधी करावी. त्यानंतर महाालिका प्रशासन मेहरुण तलावात या संकलीत झालेल्या मुर्त्यांचे पवित्र्य रून विर्सजन करणार असून मुर्ती संकलन केंद्रात नागरिकांनी मुर्ती दाण करावी असे आवाहन केले आहे.