कापसाची पाच हजार ८२५ रुपये क्विंटल दराने खरेदी 

देविदास वाणी
Tuesday, 17 November 2020

शासनाने हमीभावाप्रमाणे मका खरेदी केंद्र तत्काळ सुरू करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. मागील वर्षी सीसीआय कापूस केंद्र सुरू झाले.

जळगाव : शासनाने तत्काळ मका खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी आमदार गिरीश महाजन यांनी येथे केली. पहूर (ता. जामनेर) येथील तिरूपती जिनिंग प्रेसिंग येथे ‘सीसीआय’च्या कापूस खरेदी केंद्राच्या उद्‍घाटनावेळी ते बोलत होते. 

खरेदीच्या प्रारंभप्रसंगी कापसाला प्रतिक्विंटल पाच हजार ८२५ रुपये भाव देण्यात आला. या वेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय देशमुख, माजी सभापती बाबूराव घोंगडे, राजधर पांढरे, जिल्हा परिषद सदस्य अमित देशमुख, जामनेर पंचायत समितीचे उपसभापती सुरेश बोरसे, दौलत घोलप, किसान मोर्चाचे संतोष चिंचोले, राजू जाधव, राजमल भागवत, समाधान पाटील, प्रदीप लोढा, भास्कर पाटील, बाजार समितीचे प्रसाद पाटील, प्रशासक डी. व्ही. पाटील, सीसीआयचे प्रमोद पाटील, तिरुपती जिनिंग प्रेसिंगचे संचालक ज्ञानेश्वर पाटील, किशोर पाटील, रामेश्वर पाटील उपस्थित होते. या वेळी कोविडयोद्धा मनोज जंजाळ यांचा सत्कार करण्यात आला. 

शासनाने हमी भाव देवून दिलासा द्यावा- आमदार महाजन
आमदार महाजन म्हणाले, की शेतकऱ्यांना मक्याचे उत्पन्न या वर्षी खूप चांगले आले आहे. मात्र, बाहेर खासगी व्यापारी मका खरेदीत त्यांना योग्य मोबदला देत नसल्याने शासनाने हमीभावाप्रमाणे मका खरेदी केंद्र तत्काळ सुरू करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. मागील वर्षी सीसीआय कापूस केंद्र सुरू झाले. मात्र बऱ्याच वेळा बंद-सुरू असल्याने शेतकऱ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. मात्र या वर्षी हे केंद्र सुरळीत सुरू ठेवावे. 

 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon price of cotton is five thousand eight hundred and twenty five rupees per quintal