esakal | जामनेर; ‘पब्जी’चा बळी..खेळाच्या नादात तरुणीची आत्महत्या
sakal

बोलून बातमी शोधा

death

जामनेर; ‘पब्जी’चा बळी..खेळाच्या नादात तरुणीची आत्महत्या

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जामनेर : पब्जी या मोबाईलवरील खेळ (Pubji mobile game) खेळण्याच्या आमिषापोटी लहान मुलांसह तरुणाईलाही (Youth) आपला जीव गमवावा लागल्याच्या घटना समोर असताना शहरातील एका २० वर्षीय महावीद्यालयीन तरुणीलाही पब्जी खेळाच्या मोहापायी आत्महत्या (Suicide) करण्याची दुर्दैवी वेळ आली.

हेही वाचा: धुळ्यात तब्बल..साडेसात लाखांची ब्राउन शूगर जप्त


सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जामनेर शहरातील दत्त मंदिर, नगारखाना परिसरातील नम्रता पद्माकर खोडके (मूळ रा. भराडी, ता. जामनेर) या बारावीत शिकणाऱ्या वीस वर्षीय तरुणीने रविवारी (ता. १०) पब्जी खेळाच्या नादात एका स्टेपवर येऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. मृत्युपूर्वी मृत तरुणीने लिहिलेली चिठ्ठीही सापडल्याचे सांगण्यात येते. मृत नम्रताचे वडील खासगी स्थानिक डॉक्टरांकडे सहाय्यक डॉक्टर म्हणून काम पाहतात. आपली तरुण मुलगी गेल्यामुळे आई-वडिलांवर आभाळ कोसळल्यासारखे झाल्याचे दृष्य होते. वडील हे डॉ. के. एम. जैन यांच्याकडे सहाय्यक म्हणून कार्य करतात. स्वतःच्या घराचे बांधकाम सुरू असून, आई वाकी रोडवर घरावर पाणी मारायला गेल्या होत्या आणि इकडे तरुणीने असे कृत्य केले.

हेही वाचा: जळगाव मनपाचं डोकं ठिकाणावर आहे का..!


नम्रता खोडके हिने स्वतः च्या घरात गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली. ही युवती कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात द्वितीय वर्ष बीसीए या वर्गात शिक्षण घेत होती. घटनास्थळी पोलिस निरीक्षक किरण शिंदे, नगरसेवक हेमंत वाणी, अतीष झाल्टे, दत्तात्रय सोनवणे, जालमसिंग राजपूत, सुभाष शिंदे, लोकेश डांगी आदी होते. उपजिल्हा रुग्णालय जामनेर येथे दाखल केले असता डॉ. हर्षल चांदा यांनी तिला मृत घोषित केले. सुसाईड नोट सुद्धा लिहिली आहे. तसेच मोबाईल स्वीच ऑफ असल्याने अधिक माहिती मिळू शकलेली नाही. पोलिस यंत्रणा अधिक तपास करीत आहेत. मोबाईल ओपन झाल्यावरच तरुणीच्या मृत्यूचे खरे कारण उघड होईल.


सुसाईड नोट आढळली
नम्रता खोडके हिच्या खोलीत सुसाईड नोट आढळून आली असून, आपल्या आत्महत्येस कुणालाही जबाबदार धरू नये, अशा आशयाचा मजकूर असल्याचे पोलिसांनी सांगितले.

loading image
go to top