कोरोना व्‍हायरस होणार नष्‍ट..‘यूव्ही सरफेस स्कॅनर’ ठरणार उपयुक्‍त

सचिन जोशी
Tuesday, 22 September 2020

वस्तूव्दारे इतरांना लागण होण्याची शक्यता लक्षात घेउन गोदावरी अभियांत्रिकीचे प्रा. विजय चौधरी, प्रा. हेमराज धांडे, प्रा. महेश पाटील यांनी अथक परिश्रमानंतर यु.व्ही. लाईटचा उपयोग करून ‘सरफेस स्कॅनर’ बनवले आहे. 

जळगाव : गोदावरी अभियांत्रिकीतील प्राध्यापकांच्या टीमने अथक परिश्रमानंतर वस्तूंचा पृष्ठभाग कोरोनामुक्त करणारे ‘युव्ही सरफेस स्कॅनर’ बनविण्यात यश मिळवले आहे. 
कोविड रूग्णांना लागणाऱ्या वस्तू सॅनिटाईज करणे अत्यंत आवश्यक असते. अशावेळी या वस्तूव्दारे इतरांना लागण होण्याची शक्यता लक्षात घेउन गोदावरी अभियांत्रिकीचे प्रा. विजय चौधरी, प्रा. हेमराज धांडे, प्रा. महेश पाटील यांनी अथक परिश्रमानंतर यु.व्ही. लाईटचा उपयोग करून ‘सरफेस स्कॅनर’ बनवले आहे. 

असे बनविले यंत्र 
या मशिनमध्ये युव्ही एलईडी चा उपयोग करण्यात आला आहे.२०० ते २८० नॅनो मीटरचे अल्ट्रावायोलेट किरण हे बॅक्टेरिया आणि वायरसला ९९.९९ टक्के मारण्यास अत्यंत उपयुक्त आहे. उपकरण हाताळण्यास अत्यंत सोपे प्लग अँन्ड प्ले आणि वजनाने हलके असल्यामुळे कुठेही सहज नेता येते. या स्कॅनर सोबत डीसी सप्लाय आणि चार मीटर एसी सप्लाय वायर देण्यात आली आहे. तसेच यावर ऑन- ऑफचे बटनही आहे. जी वस्तू सॅनिटाईज करायची असेल त्यावर स्कॅनर चार सेंटीमीटर अंतरावरून दोन सेकंद एकाच ठिकाणी थांबवून पुढे परत स्कॅन करत जायचे जेणेकरून पृष्ठभाग सॅनिटाईज होइल. 

याठिकाणी ठरेल उपयुक्त 
या स्कॅनरचा उपयोग रूग्णांची फाईल, बेड, फलोअर मॅट, सोफा, फ्रिज, किचन टॉप, डायनिंग टेबल, कार, मोबाईल, दाराचे हँन्डल, इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे, यासह विविध वस्तू सॅनिटाईज केल्या जाऊ शकतात. प्राध्यापकांच्या या उपयुक्त संशोधनाबद्दल अध्यक्ष डॉ.उल्हास पाटील, सचिव डॉ.वर्षा पाटील, सदस्य डॉ. केतकी पाटील, डॉ. वैभव पाटील, प्रशासकीय अधिकारी प्रमोद भिरूड, प्राचार्य डॉ. व्ही एच पाटील, उपप्राचार्य प्रवीण फालक यांनी अभिनंदन केले आहे. 

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon research collage proffesor in corona virus solution yuvi sarfes scaner