विद्यापीठाच्या ऑनलाईन परिक्षांचे निकाल लागायला सुरवात

भूषण श्रीखंडे
Thursday, 19 November 2020

ज्या विद्यार्थ्यांनी आॕफलाईन परीक्षा दिली आहे त्यांचे निकाल विद्यापीठाच्या संकेतस्थळावर लवकर जाहीर होतील. अभियांत्रिकीचे गुरूवारी सायंकाळी उशीरा निकाल जाहीर झाले.

जळगाव ः  कोरोना संसर्ग आजारामुळे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परिक्षा आॕनलाईन पद्धतीने घेतल्या होत्या. या परिक्षांचे निकाल लागायला सुरूवात झाली असून बी काॕम, बीएस्सी,व अभियांत्रिकीसह काही अंतिम सत्राच्या परीक्षांचे निकाल जाहिर करण्यात आले आहेत.

 

आवश्य वाचा- नागरिकांनी वेढा घातला, पोलिस देखील आले तरी चोरटे चोरी करून पळाले ! -

 १२ आॕक्टोबरपासून अंतिम  वर्षाच्या आॕनलाईन व आॕफलाईन परीक्षा घेण्यात आल्या. यातील काही परीक्षांचे निकाल जाहीर झाले आहेत.बीएस्सी आॕनलाईन परीक्षाचे निकाल जाहीर झाले. आॕफलाईन परीक्षाचे लवकरच जाहीर होतील.याशिवाय बी फार्म, बी व्होक ब्युटी थेरपी फॕशन डिझायनिंग, बी बी ए, बीएम एस ई- काॕमर्स,एम.बी.ए, एम टेक,बी काॕम, बी सी ए, बी.एम.एस,, एम.एस.डब्ल्यू, विद्यापीठ प्रशाळेतील एमएस्स.सी ( काॕम्प्युटर आय.टी.),स्टॕटेस्टिक  तसेच एम ए.एमसीजे, एमसीए या परीक्षांचे निकाल जाहीर झाले असल्याची माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळ संचालक बी पी पाटील यांनी दिली. ज्या विद्यार्थ्यांनी आॕफलाईन परीक्षा दिली आहे त्यांचे निकाल विद्यापीठाच्या संकेतस्थळावर लवकर जाहीर होतील. अभियांत्रिकीचे गुरूवारी सायंकाळी उशीरा निकाल जाहीर झाले.

परिक्षा न दिलेल्या विद्यार्थ्यांच्या परिक्षा सुरू

अंतिम वर्षाच्या बॅकलॉगसह नुकत्याच घेण्यात आलेल्या परीक्षेत जे विद्यार्थी काही कारणामुळे परीक्षा देऊ शकले नव्हते अशा वंचित विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन परीक्षा सुरू झाल्या आहे. दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत १२४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. दरम्यान १८ ते २० नोव्हेंबर, २०२० या कालावधीत एमसीक्यु पॅटर्ननुसार फक्त ऑनलाईन पध्दतीने वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात येत आहेत.  जे विद्यार्थी परीक्षा अर्ज सादर करूनही परीक्षा देऊ शकले नाहीत त्यांच्यासाठी ऑनलाईन पध्दतीने सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत या परीक्षा घेण्यात येत आहेत. १२ ते २० ऑक्टोबर २०२० या कालावधीतील वेळापत्रकातील सर्व विषयांसाठी त्यांच्याशी संबंधित असलेल्या विषयांची परीक्षा  १८ ते २० नोव्हेंबर, २०२० या कालावधीमध्ये आणि दि.२४ ऑक्टोंबर ते १२ नोव्हेंबर या कालावधीतील वेळापत्रकातील सर्व विषयांसाठी परीक्षा दि.२१ ते २३ नोव्हेंबर कालावधीत परीक्षा घेतल्या जात आहेत. गुरूवारी  १२४ विद्यार्थ्यांनी ऑनलाईन परीक्षा दिल्याची माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक बी.पी.पाटील यांनी दिली. विद्यार्थ्यांनी परीक्षा देताना आॕक्टोबर महिन्यातील ज्या तारखाला झालेली परीक्षा आता देत आहेत त्या तारखेचा उल्लेख लाॕगईन करताना करावा म्हणजे त्या विषयाचे पेपर त्यांना दिसतील.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon results of the online exams of the university are starting to come out