फिरायला गेले अन्‌ सारे गमावून बसले; रस्‍त्‍यावर लूट

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 3 November 2020

रोज सायंकाळी शतपावली करण्यासाठी घराबाहेर पडत असतात. नेहमीप्रमाणे ते कानळदा रोडवर शतपावली करण्यासाठी गेले असताना सायंकाळी दोन अनोळखी व्यक्ती समोर येवून उभे राहिले.

जळगाव : सायंकाळी नेहमीप्रमाणे फिरायला गेले. पण पाडत ठेवून असलेल्‍या अज्ञात दोन जणांनी चाकूचा धाक दाखवून अंगावरील सोन्याच्या वस्तू आणि ८० हजाराची रोकड लूट केल्याची घटना कानळदा रोडवर घडली. याप्रकरणी तालुका पोलीस स्‍टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव शहरात व्यापार करणारे महेंद्रकुमार लक्ष्मीनारायण मंडोरे (वय ६४) हे रोज सायंकाळी शतपावली करण्यासाठी घराबाहेर पडत असतात. नेहमीप्रमाणे ते कानळदा रोडवर शतपावली करण्यासाठी गेले असताना सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास कानळदा रोडवरील ईदूमोती टेक्स फेंब कंपनीसमोर दोन अनोळखी व्यक्ती महेंद्र मांडोरे यांच्या समोर येवून उभे राहिले. 

मग त्‍यांनी काढला चाकू
दोन जणांनी अडविल्‍यानंतर महेंद्र मंडोरे यांनी त्‍यांना हटकले. परंतु यातील एकाने मंडोरे यांच्या पोटाला चाकू लावत धमकावले. यानंतर शर्टाच्या खिशातील ८० हजार आणि गळ्यातील १ लाख ५७ हजार रूपये किंमतीची ६३ ग्रॅमची ब्रेसलेट, १ लाख ३७ हजार रूपये किंमतीची ५५ ग्रॅमची सोनसाखळी आणि १५ ग्रॅमची सोन्याची अंगठी असा एकुण ४ लाख १२ हजार ५०० रूपयांची लुट केली. महेंद्रकुमार मंडोरे यांनी तत्काळ तालुका पोलीस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात दोन अज्ञात दरोडेखोरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon on robbery on the road