१ नोव्हेंबरपासून वाहन परवाना होणार निलंबित; अवजड वाहनांसाठी नियमावली 

देविदास वाणी
Tuesday, 20 October 2020

राज्य परिवहन प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या ठरावानुसार जादाभार वाहतूक करणा-या वाहनाच्या परवानाधारकांकडून मोटार वाहन अधिनियम १९८८ च्या नियम ८६ अंतर्गत विभागीय कारवाई सुरु होणार

जळगाव : राज्यात सर्व प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या धोरणांमध्ये समन्वय राखण्याच्यादृष्टीने राज्य परिवहन प्राधिकरणाने घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी जळगाव प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या क्षेत्रात करण्यात येणार आहे. या निर्णयांची अंमलबजावणी १ नोव्हेंबरपासून सुरू करण्यात येणार आहे. अशी माहिती सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे यांनी दिली. 

राज्य परिवहन प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या ठरावानुसार जादाभार वाहतूक करणा-या वाहनाच्या परवानाधारकांकडून मोटार वाहन अधिनियम १९८८ च्या नियम ८६ अंतर्गत विभागीय कारवाई सुरु होणार असून सकल भार क्षमतेपेक्षा (जी.व्ही. डब्ल्यु) अतिरिक्त वजनाच्या मालाची वाहतूक करणाऱ्या हलकी मालवाहू वाहने - अतिरिक्त भार ५ हजार किलोग्रॅमपर्यंत पहिल्या गुन्हयांसाठी परवाना १० दिवसाकरीता निलंबित करणे अथवा निलंबनाऐवजी सहमत शुल्क ५ हजार रुपये राहील. दुसऱ्या गुन्ह्यासाठी परवाना २० दिवस निलबंन अथवा सहमत शुल्क १० हजार रुपये तर तिसऱ्या गुन्ह्यासाठी परवाना ३० दिवस निलंबन अथवा सहमत शुल्क १५ हजार रुपये असे राहील. ५००१ किलो ग्रॅमपेक्षा जास्त भार असल्यास परवाना १० दिवसाकरिता निलंबित करणे अथवा निलंबनाऐवजी सहमत शुल्क ७ हजार रुपये राहील. दुसऱ्या गुन्ह्यासाठी परवाना २० दिवस निलंबन अथवा सहमत शुल्क १४ हजार रुपये तर तिसऱ्या गुन्ह्यासाठी परवाना ३० दिवस निलंबन अथवा सहमत शुल्क २१ हजार रुपये असे राहील. 

मध्यम मालवाहू वाहने 
अतिरिक्त भार ५ हजार किलोग्रॅमपर्यंत पहिल्या गुन्ह्यांसाठी परवाना १० दिवसाकरीता निलंबित करणे अथवा निलंबनाऐवजी सहमत शुल्क १० हजार रुपये राहील. दुसऱ्या गुन्ह्यासाठी परवाना २० दिवस निलबंन अथवा सहमत शुल्क २० हजार रुपये तर तिसऱ्या गुन्ह्यासाठी परवाना ३० दिवस निलंबन अथवा सहमत शुल्क ३० हजार रुपये असे राहील. तर ५००१ किलो ग्रॅमपेक्षा जास्त भार असल्यास परवाना १० दिवसाकरिता निलंबित करणे अथवा निलंबनाऐवजी सहमत शुल्क १५ हजार रुपये राहील. दुसऱ्या गुन्ह्यासाठी परवाना २० दिवस निलंबन अथवा सहमत शुल्क ३० हजार रुपये तर तिसऱ्या गुन्ह्यासाठी परवाना ३० दिवस निलंबन अथवा सहमत शुल्क ४५ हजार रुपये असे राहील. 

जड मालवाहू वाहने 
अतिरिक्त भार ५ हजार किलोग्रॅमपर्यंत पहिल्या गुन्ह्यांसाठी परवाना १० दिवसांकरिता निलंबित करणे अथवा निलंबनाऐवजी सहमत शुल्क २० हजार रुपये राहील. दुसऱ्या गुन्ह्यासाठी परवाना २० दिवस निलंबन अथवा सहमत शुल्क ४० हजार रुपये तर तिसऱ्या गुन्ह्यासाठी परवाना ३० दिवस निलंबन अथवा सहमत शुल्क ६० हजार रुपये असे राहील. तर ५००१ किलो ग्रॅमपेक्षा जास्त भार असल्यास परवाना १० दिवसाकरिता निलंबित करणे अथवा निलंबनाऐवजी सहमत शुल्क २५ हजार रुपये राहील. दुसऱ्या गुन्ह्यासाठी परवाना २० दिवस निलबंन अथवा सहमत शुल्क ५० हजार रुपये तर तिसऱ्या गुन्ह्यासाठी परवाना ३० दिवस निलंबन अथवा सहमत शुल्क ७५ हजार रुपये असे राहील. 

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon rto new regulations for heavy vehicles on first november