खानदेशातील सातपुडा पर्वतरांगामध्ये हे आहेत निसर्गरम्य ठिकाणे..

खानदेशातील सातपुडा पर्वतरांगामध्ये अनेक निसर्ग सौदंर्याने नटलेले सुंदर स्थळे असून येथे पर्यटकांची गर्दी नेहमी असते.
Satpuda mountain
Satpuda mountain

जळगाव ः सातपुडा पर्वतरांगाचा (Satpuda mountain) विस्तार नागपूरपासून ते नाशिक जिल्ह्यापर्यंत आहे. सातपुडा पर्वतरांमध्ये अफाट पसरलेले निसर्ग सौंदर्य हे पर्यटकांना (Tourists)नेहमी आकर्षीत करणारे आहे. खानदेशातील जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यातून सातपुडा पर्वतरांगा गेल्या आहे. या पर्वत रांगामध्ये विविध वन्यजीव (Wildlife), वनस्पती (Plants) सोबत पर्यटनाचे सुंदर असे ठिकाणे पर्यटकांना नेहमीच आकर्षीत करत असतात. पर्यटन दिनानिमित्त चला जाणून घेवू खानदेशातील सातपुडा पर्वतरांगा मधील बेस्ट पर्यटन स्थळांबद्दल...

निसर्ग सौंदर्याची पर्यटाकांना भुरळ (जळगाव)

जळगाव जिल्ह्यातून सातपुडा पर्वत रांगा गेल्या असून पर्वतरांगामधे निर्सगाचे अनेक सुंदर ठिकाणे आहे. त्यात जळगाव येथील थंड हवेचे ठिकाण व पर्यटनासाठी अतिशय चांगले असलेले 'पाल' स्थळ पर्यटकांना भुरळ घालतात. येथे पावसाळा व हिवाळ्यात विहमंगय दुष्य असते. येथील घनदाट जंगल, नदी, डॅम असे दृष्य तुम्हाला दिसेल. तसेच चोपडा तालुक्यातील मनुदेवी हे मंदिर सातपुड्याच्या डोंगर रांगाच्या कुशीत आहे. चार ही बाजूने डोंगर, घनदाट जंगल आणि जवळच डोंगराच्या कडेवरून कोसळणारा धबधबा असे मोहक दृष्य येथे दिसते. तसेय चाळिसगाव तालुक्यातील पाटना देवी मंदिर देखील प्रसिध्द आहे. तसेच सातपुडा पवर्त रांगाच्या पायथाळी विविध लहान धरणे असून हे देखील पर्यटनासाठी नविन स्थळे आता बलू लागली आहे. तसेच सातपुड्याच्या पायथाशी असलेले जानोरी गावजवळील येथील डोंगराच्या कुशीत असलेले भवानी मंदिर देखील प्रसिध्द असून जानेवारी महिन्यात येथे मोठी यात्रा येथे भरत असते. तर जळगाव जिल्ह्या जवळ मात्र सातपुड्याच्या कुशीत पण मध्यप्रदेश मध्ये येत असलेले 'ताजुद्दीन बाबा दर्गा' हे ट्रँकींग करण्यासाठी नंदनवनच आहे. उंच पर्वाताच्या टोकावर ही दर्गा असून येथे सर्व धर्माचे लोक येत असतात तर दर्गा जवळ खुपसदेव महाराजाचे मंदिर आहे. येथून सातपुड्याच्या पर्वत रांगाचे सुंदर दृष्य तुम्ही बघू शकतात. तसेच घनदाट जंगलात असलेले शिरवेलचा महादेव मंदिर हे स्थळ देखील पर्यटकांसाठी खास आकर्षणाचे ठिकाण असते. येथे श्रावण महिन्यात भावीकांची मोठी गर्दी असते.

डोळ्याचे पारणे फेडणारे स्थळे (नंदुरबार)

नंदुरबार जिल्ह्यातील सातपुड्यात डोळ्यांची पारणे फेडणारी अनेक प्रेक्षणीय स्थळे असून त्यांचे सौंदर्य न्याहाळण्यासाठी बाराही महिने खानदेशातीलच नव्हे, तर शेजारील गुजरात, मध्यप्रदेश राज्यातील हौशी पर्यटक, पर्यावरणप्रेमी हजारोच्या संख्येने भेट देत असतात. सातपुड्याला नैसर्गिक सौंदर्याचे कोंदण असून डोंगरदऱ्यात नागरिकांना आकर्षित करणारी असंख्य प्रेक्षणीय स्थळे आहेत. ती बाराही महिने नागरिकांचे मन मोहून घेतात. ही स्थळे राज्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळे महाबळेश्वर, आंबोली यांची आठवण करुन देणारी आहेत. यात राज्यातील दोन नंबरचे थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखले जाणारे सीताखाई, यशवंत तलाव यासारखे अनेक मनमोहक पॉइंट असणारे तोरणमाळ तसेच पौराणिक महत्त्व असलेले अश्वस्थामाचे शिखर, वाल्हेरी येथील फेसाळणारे धबधबे, चांदसैली घाटातील आकर्षित करणाऱ्या पर्वतरांगा, डोंगरावर लोळणारे ढग व काळजाचे ठोके चुकविणाऱ्या दऱ्या अशी विविध स्थळे पर्यटकांना आकर्षित करतात.बिलगाव येथील बारामुखी धबधबा असो, की कुंडलेश्वर येथील महादेव मंदिर व गरम पाण्याचे झरे आकर्षित करतात. गेंदा गावाजवळ नैसर्गिकरीत्या तयार झालेली दरी व तेथील सौंदर्य नागरिकांचे मन मोहित करते. चांदसैली घाट रस्त्यावरून गढवली, रोझवा, पाडळपूर प्रकल्पातील चंदेरी दिसणारे पाणी नागरिकांना काही काळ तिथे थांबण्यासाठी परावृत्त करते. त्यामुळे आल्हाददायक वातावरणाचा आनंद लुटण्यासाठी सातपुड्याच्या या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर नेहमीच गर्दी होत असते.

निसर्ग रम्य ठिकाण (धुळे)

धुळे जिल्ह्यातील सातपुडा पर्वत रांगामध्ये तसेच जवळ अनेक विविध पर्यटनासाठी सुंदर स्थळे आहेत. यात धुळ्याजवळील वन विभागाच्या अंतर्गत लंळीग पुरण हे पर्यटन स्थळ निसर्ग संपन्न आहे. येथे सनसेट पाॅईंट, वन विभागाने तयार केलेले बाॅटनीक गार्डन, लंळीग किल्ला तेथील दऱ्यामधून कोसळणारे धबबे हे मन मोहीत करते. तसेच शिरपुरला रिक्रीएशन गार्डन प्रसिध्द असून खानदेशातून येथे पर्यटक फिरायला येत असतात. तसेच सातपुड्यातील अलाल दरी हे स्थळ देखील पर्यटकांमध्ये आकर्षण असून पावसाळ्यातील येथील दुष्य मोहक असून दोरीत कोसळणाऱ्या धबधब्यांचे विगंमय दुष्य येथे दिसते. तसेच टेकीड लगत निर्सगरम्य वातावरणात सुंदर असे कन्हयालाल महाराज मंदीर आहे. येथे नि्द्रा अवस्थेत कन्हयालाल महाराजांची मुर्ती असून महाराजांना विष्णूचे आवतार म्हणून ओळखले जाते हे निसर्ग रम्य वातावरण असून येथे दरवर्षी मोठी जत्रा भरते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com