esakal | सावद्यात भर रस्त्यात खुन...लोखंडी रॉडने केला हल्‍ला
sakal

बोलून बातमी शोधा

Murder

ख्वॉजानगरच्या रस्त्यावर रईस चौधरी उभा असताना दोन, तीन अज्ञात व्यक्तींनी त्याच्यावर लोखंडी पाइपने हल्ला चढवला. डोक्याला जबर मार लागल्याने तो जागीच ठार झाला. घटनास्थळी रक्तच्या थारोळ्यात मृतदेह पडून होता.

सावद्यात भर रस्त्यात खुन...लोखंडी रॉडने केला हल्‍ला

sakal_logo
By
प्रविण पाटील

सावदा (जळगाव) : येथील ख्वॉजानगरमध्ये भरवस्तीत प्रौढाचा खून करण्यात आला. मृत व्यक्तीचे नाव रईस दिलदार चौधरी ऊर्फ डगा असून, तो मूळ गाव लालबाग (मध्यप्रदेश) येथील आहे. गेल्या काही दिवसांपासून तो सावदा येथील ख्वॉजानगर भागात वास्तव्यास होता. ही घटना गुरुवारी (ता. २०) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास भररस्त्यावर घडली. 

ख्वॉजानगरच्या रस्त्यावर रईस चौधरी उभा असताना दोन, तीन अज्ञात व्यक्तींनी त्याच्यावर लोखंडी पाइपने हल्ला चढवला. डोक्याला जबर मार लागल्याने तो जागीच ठार झाला. घटनास्थळी रक्तच्या थारोळ्यात मृतदेह पडून होता. घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलिस निरीक्षक राहुल वाघ, पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र पवार व सहकारी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला व मृतदेह शवविच्छेदनासाठी रावेर येथील ग्रामीण रुग्णालयात रवाना केला. तसेच जिल्हा पोलिस उप अधीक्षक भाग्यश्री नवटके, उपविभागीय पोलिस अधिकारी नरेंद्र पिंगळे यांनी भेट देऊन घटनास्थळाची पाहणी केली. घटनास्थळी परिसरातील नागरिकांची मोठी गर्दी जमा झाली. दरम्यान, मृत व्यक्तीचा भाऊ व नातेवाईक घटनास्थळी आल्यावर त्यांनी एकच आक्रोश व संताप व्यक्त केला. हत्यार म्हणून ज्या पाइपाचा वापर हल्लेखोरांनी केला, तो घटनास्थळी पडलेला होता. जळगाव येथील फॉरेन्सिक लॅबच्या तज्ज्ञांनी घटनास्थळी येऊन पाईप ताब्यात घेतला. खुनाचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून, पूर्ववैमनस्यातून हा हल्ला झाल्याचे प्राथमिक माहितीतून समोर येत आहे.दरम्यान, रईस याच्याविरोधात लालबाग पोलिस ठाण्यात काही गुन्हे दाखल असल्याचे समजते. पोलिसात गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू आहे. तपास पोलिस करीत आहेत.

loading image
go to top