जळगाव पून्हा हादरले; शिवाजीनगरात पाच दिवसात दुसरा खून !

भूषण श्रीखंडे
Monday, 9 November 2020

जळगाव शहरातील शिवाजीनगर परिसरात पाच दिवसात सलग दुसरा खून झाल्याने खळबळ उडाली आहे. 

जळगाव ः जळगाव शहरातील शिवाजीनगर परिसरात पाच दिवसापूर्वी माजी महापौरांच्या मुलाचा खून झाल्याची गंभीर घटना घडली होती. त्यामुळे शहरातील कायद्या सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यात रविवारी रात्री शिवाजीनगर परिसरातील इंद्रप्रस्थनगरातील खडकेचाळ येथील पंचवीस वर्षीय तरुणाचा पोटात चाकुने वार करून खून केल्याची घटना घडली. यामुळे जळगाव शहरातील शिवाजीनगर परिसरात पाच दिवसात सलग दुसरा खून झाल्याने खळबळ उडाली आहे. 

शिवाजीनगर परिसरातील भूषण भरत सोनवणे (वय २५. रा. इंद्रप्रस्थ नगर)  सिध्दीविनायक पार्क जूना कानळदा रोड येथे कुटूंबास राहतो. रविवारी भूषण हा इंद्रप्रस्थ चौकात ज्ञानेश्वर काटकर, प्रतिक निंबाळकर, दुर्गेश संन्यास यांच्यासोबत रात्री आकरा वाजता उभा होता. चार ही जण दारू पिलेले असतांना आपसात त्यांच्या वाद झाला. यावेळी भूषण ने प्रतिकच्या कानात मारल्याने प्रतिक निबांळकर, अतुल काटकर यांने चाकुने भूषणवर वार केले.  खोलवर वार झाल्याने भूषणचा जागीच मृत्यु झाला. घटनेनंतर संशयीत पळून गेले होते. भूषणच्या आईच्या तक्रारीवरून शहर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंदविला आला आहे. तपास सहाय्यक पोलिस अधीक्षक कुमार चिंथा करीत आहे.

पोलिसांनी संशयितांना घेतले ताब्यात
पोलिसांनी घटनास्थळी तत्काळ जावून घटनेचा अंदाज घेत सोबत कोण कोण होते याचा तपास करून तपासचक्र रात्रीच फिरवले. शहर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक धनंजय येरुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने गुप्त माहिती गाढून घरातुन फरार होत असतांना अतुल काटकररला तर प्रतीक निंबाळकर याला बहिणाबाई उद्यानाजवळून ताब्यात घेतले. तर आज न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

शिवाजीनगरात तणाव
सलग पाच दिवसात दुसरी खूनाची घटना शिवाजीनगर परिसरात घडल्याने तणावाचे वातवरण निर्माण झाले आहे. तसेच परिसतील नागरिकांना मध्ये देखील भितीचे वातावरण असून पोलिसांचा चौकात बंदोबस्त लावला आहे.  

मयत भूषणवर अनेक गून्हे  
भूषण सोनवणे अनेक गुन्हे दाखल असून याच्यावर २०१८ साली हद्दपार लावण्यात आले होते. दद्दपारची मुदत संपल्यानंतर परत आल्यावर देखील त्याच्यावर हानामारीचे गुन्हे दाखल असून सोबतचे दोन जणांवर गुन्हे दाखल आहे.     


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon second murder in five days in jalgaon shivajinagar