esakal | खडसे-फडणवीसांमध्ये अशी पडली वादाची ठिणगी; वाचा एका क्लिकवर
sakal

बोलून बातमी शोधा

खडसे-फडणवीसांमध्ये अशी पडली वादाची ठिणगी; वाचा एका क्लिकवर

फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळातून राजीनामा दिल्यापासून खडसेंनी पक्षनेतृत्व, फडणवीसांवर वेळोवेळी नाराजी व्यक्त केली होती. 

खडसे-फडणवीसांमध्ये अशी पडली वादाची ठिणगी; वाचा एका क्लिकवर

sakal_logo
By
भूषण श्रीखंडे

 जळगाव ः गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेशाच्या चर्चेला पूर्णविराम देत अखेर भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी बुधवारी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला. फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळातून राजीनामा दिल्यापासून खडसेंनी पक्षनेतृत्व, फडणवीसांवर वेळोवेळी नाराजी व्यक्त केली होती. नेमके फडणवीस व खडसेंमध्ये कशा मुळे, कसा, केव्हा काय घडले याची सविस्तर माहिती.

फडणवीसांशी वादाची अशी पडली ठिणगी 

- ऑक्टोबर २०१४ : राज्यात भाजपचे सरकार 
-ऑक्टोबर : २०१४ : मुख्यमंत्रिपदी देवेंद्र फडणवीस 
- बहुजन समाजाचा मुख्यमंत्री हवा होता : खडसेंच्या वक्तव्यावरुन वाद 
- खडसेंकडे महसूल, मदत व पुनर्वसन, राज्य उत्पादन शुल्क, कृषी यासह १२ खात्यांचे मंत्रिपद 
- फडणवीस मुख्यमंत्री तरीही मंत्रालयात खडसेंचाच दरारा 
- खडसेंच्या मंत्रिमंडळ बैठकीतील वर्चस्वाने फडणवीस नाराज 
- एप्रिल/मे २०१६ : खडसेंवर कथित स्वीय सहाय्यक लाच, दाऊदशी संभाषण, भोसरी जमीन खरेदी व्यवहार आदी गैरव्यवहाराचे आरोप 
- याच काळात अंजली दमानिया, प्रीती शर्मा यांच्याकडूनही आरोप 
- ४ जून २०१६ : खडसेंचा मंत्रिपदाचा राजीनामा 
- जून २०१६ : भोसरी जमीन खरेदी प्रकरणी न्या. झोटिंग समिती स्थापन 
- जून २०१६ : खडसे सर्व चौकशांमधून बाहेर पडतील, तीन महिन्यांत पुन्हा मंत्रिमंडळात घेऊ : फडणवीस 
- जून २०१६ पासून पुढे वारंवार झोटिंग समितीला मुदतवाढ 
- सरकारचा कार्यकाळ पूर्ण होईपर्यंत खडसेंचे पुनर्वसन नाहीच 
- २०१९च्या लोकसभा निवडणुकीत स्नुषा रक्षा खडसेंच्या उमेदवारीवरुन घोळ 
- मोठ्या संघर्षानंतर रक्षा खडसेंना लोकसभेची उमेदवारी 
- ऑक्टोबर २०१९ : विधानसभा निवडणुकीत खडसेंना उमेदवारी नाकारली 
- ऑक्टोबर २०१९ : कन्या ॲड. रोहिणी खडसेंना ऐनवेळी उमेदवारी जाहीर 
- निवडणुकीत रोहिणी खडसेंचा धक्कादायक पराभव 
- पक्षातील काहींनी पराभवासाठी प्रयत्न केले : खडसेंचा आरोप 
- डिसेंबर २०१९ : गोपीनाथगडावर मुंडेंच्या स्मृतिदिनी कार्यक्रमात पक्षनेतृत्वावर टीका 
- त्यानंतर राज्यसभा, राज्यपालपद तसेच विधानपरिषदेवर घेण्याबाबत खडसेंना आश्‍वासन 
- भाजपकडून आश्‍वासन पूर्ती नाहीच 
- जून २०२० : भाजपकडून विधानपरिषदेवर गोपीचंद पडळकरांसह अन्य उमेदवार 
- खडसेंची पुन्हा फडणवीस, चंद्रकांत पाटलांवर तोफ 
- खडसेंच्या घरात किती पदे देणार : चंद्रकांत पाटलांचे प्रत्युत्तर 
- २ व १० सप्टेंबर २०२० : फडणवीसांनीच रचले षडयंत्र; पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात खडसेंचा आरोप 
- फडणवीसांचे प्रत्युत्तर : मी घरातली धुणी रस्त्यावर धूत नाही 
- २३ सप्टेंबर : शरद पवारांकडून खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाची चाचपणी 
- ४ ऑक्टोबर : खडसेंची मुंबई वारी, शरद पवारांशी भेट झाल्याची चर्चा 
- १८ ऑक्टोबर : खडसेंच्या भाजपतील राजीनाम्याचे वृत्त; त्यांच्याकडून इन्कार 
- २० ऑक्टोबर : खडसेंचा भाजप सदस्यत्वाचा राजीनामा, राष्ट्रवादीत प्रवेशाची घोषणा 
 

loading image