
शिवसेना गटनेते अनंत जोशी व नगरसेवक प्रशांत नाईक यांनी महापौरांचा वाजत गाजत व सन्मानपत्र देवून सत्कार केला होता
जळगावः जळगाव महानगर पालिकेच्या महासभेत भाजपचे महापौर भारती सोनवणे यांचा त्यांनी त्यांच्या कार्यकाळात चांगले काम केल्याबद्दल शिवसेनेचे गटनेते अनंत जोशी, नगरसेवक प्रशांत नाईक यांनी महासभेत सत्कार केला होता. या प्रकरणी शिवसनेच्या वरिष्ठांना न सांगता सत्कार केल्याबद्दल शिवसेना संर्पक प्रमुखांनी जोशी यांचे कान टोचले होते. याबाबत आज गटनेते श्री. जोशी यांनी वरिष्ठांना मी केलेल्या सत्कार चुकीचा वाटत आहे त्यामुळे माझी चुक मान्य करीत गटनेता पदाचा राजीनामा महानगरप्रमुखांकडे दिला आहे असे सांगितले.
भाजप महापौर भारती सोनवणे यांचा पदाचा कार्यकाळ संपत असल्याने शनिवारी त्यांची शेवटची महासभा होती. त्यांनी कोरोनाच्या काळात व त्यांच्या सव्वा वर्षाच्या कार्यकाळात शहराच्या विकास कामांसाठी निधी, रखडलेले कामांना गती आदी चांगले काम केल्याबद्दल शिवसेना गटनेते अनंत जोशी व नगरसेवक प्रशांत नाईक यांनी महापौरांचा वाजत गाजत व सन्मानपत्र देवून सत्कार केला होता. याप्रकरणी शिवसेना संपर्क प्रमुखांनी रविवारी शिवसेनेच्या सर्व नगरसेवकांची बैठक घेवून या प्रकाराबाबत नाराजी व्यक्त केली होती. तसेच सदस्यांना वरिष्ठांना विचारल्या शिवाय करू नये अशी ताकीद दिली होती.
चांगल्या कामाचे कौतूक नेहमी करणार- जोशी
पत्रकार परिषदेत बोलतांना अनंत जोशी म्हणाले, की चांगल्या कामाचे कौतूक करणे हे आमच्या वरिष्ठांकडून शिकत आलो आहे. महापौरांनी चांगले काम केले म्हणून त्याचे मी कौतूक केले. महापालिकेत शिवसेना विरोधीपक्षाचे काम चोख बजावित असून मी देखील भाजपला कामय विरोध करत आलो आहे. अजून ठाम पणे भाजपच्या विरोधात मी राहील. मी सत्कार केला म्हणून भाजपच्या जवळीक आहे असे काही नाही.
शिवसेनेत आता अतंर्गत गटबाजी
महापालिकेत यापूर्वी भाजपमध्ये गटबाजी असल्याचे बोलले जात होते. परंतू आता शिवसेनेत देखील अंतर्गत कलह सुरू झाल्याचे आता दिसू लागले आहे. भाजप महापौरांचा सत्कार केल्या प्रकरणी शिवसेना गटनेता पदाचा जोशी यांनी राजीनामा दिला. तसेच संपर्क प्रमुखांनी बैठकीमधील चर्चा कुठे बाहेर जाता कामा नये असे सांगून देखील बैठकीतील माहिती बाहेर पडल्याने शिवसेनेत आता गटबाजी सुरू झाल्याचे दिसत आहे.