आठ महिन्यांनी सापडली‘सुसाइड नोट’आणि समोर आले आत्महत्येचे गूढ

घराची झाडपूस आणि साफसफाई करत असताना पतीच्या कपाटातील जुने कपडे काढत असताना आधारकार्डसह काही चिटोऱ्या, बिल मिळून आले.
Suicide
Suicide

जळगाव : धानवड (ता. जळगाव) शिवारात शेतजमीन असलेल्या अल्पभूधारक शेतकरी (Farmer) सुकलाल घोडके (वय ५१) यांनी १९ जानेवारी २०२१ ला गळफास घेत आत्महत्या (Suicide) केली होती. तब्बल आठ महिन्यांनंतर मृत शेतकऱ्याने लिहून ठेवलेली ‘सुसाइड नोट’ सापडली आहे. यानंतर पीडित कुटुंबीयांनी पोलिसांत (Jalgaon Midc Palice) धाव घेतली. चिठ्ठीची खातरजमा करून एमआयडीसी पोलिसांत शेत विकायला भाग पाडणारा दलाल आणि सावकार अशा दोघांवर आत्महत्त्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल झाला.

Suicide
कोरोनाची लाट सरली तरी अर्थचक्र मात्र रुळावर येईना!


पीडित शेतकऱ्याची पत्नी शोभा घोडके (वय ४२) यांच्या तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे, त्यांचे पती सुकलाल घोडके यांनी १९ जानेवारीला गळफास घेत आत्महत्या केली होती. त्यानंतर शोभा घोडके यांनाही खासगी नोकरी करावी लागली. तर, मुलगा हर्षल मिळेल ते काम करुरून कुटुंबीयांना मदत करतो. पतीचा मृत्यू होऊन आठ महिने लोटले असताना अचानक सुटीच्या दिवशी शोभा घोडके घराची झाडपूस आणि साफसफाई करत असताना पतीच्या कपाटातील जुने कपडे काढत असताना आधारकार्डसह काही चिटोऱ्या, बिल मिळून आले. त्यात वहीच्या पानावर लाल पेनाने लिहिलेली चिठ्ठी मिळाली.

Suicide
अभिनेते अनुपम श्याम यांचे निधन

उलगडले आत्महत्याचे कारण..

बऱ्याच दिवसांपासून घडी केलेली ही चिठ्ठी कागदांच्या चिटोऱ्यात अडगळीत कुजत पडल्याने तिचा एक तुकडा कुठेतरी हरवला मात्र, अर्धा फाटलेल्या या चिठ्ठीतील ‘मायना’ वाचल्यावर घोडके कुटुंबीयांच्या पायाखालची वाळूच सरकली. ताणतणावातून पतीने आत्महत्या केल्याचा समज झाला असताना या चिठ्ठीतील मजुकराने पती सुकलाल यांच्या मृत्यूचे काळे सत्य समोर आणले. चिठ्ठी घेऊन शोभा घोडके मुलगा हर्षलसह पोलिस ठाण्यात गेल्या. पोलिसांनी गांभीर्य ओळखत या प्रकरणी शेत विक्रीचा सौदा करणारा दलाल प्रकाश माळी व न दिलेल्या दोन लाखांवर व्याज आकारणारा सावकार शैलेंद्र वसंत चिरमाडे यांच्याविरुद्ध आत्महत्त्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com