चिमुरड्याने केली कोरोनावर मात 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 2 June 2020

चार जणांचा संपर्कात आल्याने तपासणी अहवाल कोरोना पाँझीटिव्ह आला होता. त्यावर येथील कोवीड केअर सेंटरमध्ये उपचार सुरू होते. त्याने कोरोनावर मात केली असून, त्यास आज डिस्चार्ज देण्यात आला. प्रशासनाने टाळ्या वाजवून त्यास डिस्चार्ज दिला.

पारोळा : वेल्हाणे (ता. पारोळा) येथील एका सहा वर्षाच्या चिमुरड्यास कोरोनाची लागण झाली होती. मुंबई येथुन कुटुंबासोबत पिकअपने घराकडे येताना नंदुरबार येथील चार जणांचा संपर्कात आल्याने तपासणी अहवाल कोरोना पाँझीटिव्ह आला होता. त्यावर येथील कोवीड केअर सेंटरमध्ये उपचार सुरू होते. त्याने कोरोनावर मात केली असून, त्यास आज डिस्चार्ज देण्यात आला. प्रशासनाने टाळ्या वाजवून त्यास डिस्चार्ज दिला. 
प्रांताधिकारी विनय गोसावी, तहसीलदार अनिल गवांदे, मुख्याधिकारी डॉ. विजयकुमार मुंडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रांजली पाटील, डॉ. योगेश साळुंखे, डॉ. गिरीश जोशी, डॉ. चेतन महाजन, डॉ. निखिल बोरा, शहर तलाठी निशिकांत पाटील, म्हसवे तलाठी गौरव लांजेवार, डॉ. कुणाल पाटील, नर्स आदी उपस्थित होते. यावेळी प्रशासनाने कोरोनामुक्त रुग्णांचे टाळ्यावाजुन व फुलांच्या वर्षावाने त्यास डिस्चार्ज दिला. यावेळी उपस्थित व त्याच्या पालकांना आनंदाश्रू अनावर झाले होते. स्वागत केले. 
तालुक्यात गेल्या दोन महीन्यापासुन कोरोना शिरकाव नव्हता.परंतु ता,23 रोजी डी डी नगर येथे पहीला कोरोना रुग्ण आढळला.यामुळे प्रशासन कामाला लागले.एक रुग्णाबरोबर आता तालुक्याची रुग्णांची बाधीत संख्खा सहावर पोहचली होती.परंतु डाँक्टरांच्या रात्रंदिवस मेहनतीने व प्रशासनाच्या योग्य नियोजनामुळे आज दुसरा रुग्ण कोरोना मुक्त झाल्याने सर्वांनी आनंदाने त्याचे स्वागत केले.यावेळी कोरोनामुक्त रुग्णास काहीही एक लक्षणे दिसत नसल्यामुळे आज त्यास डिस्चार्ज देण्यात आला. दुसऱ्या एका रूग्णासही डिस्जार्च देण्यात आला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon six year boy corona Outperform