
चाळीसगाव : जून महिन्याचा सुरवातीलाच पावसाला सुरवात झाली आहे. त्यामुळे पावसाचे पाणी बिळांमध्ये शिरून सर्प बिळांबाहेर येऊ लागले आहेत. त्यामुळे सर्पमित्रांना येणारे कॉल वाढत आहेत. पावसाळ्यातच सर्पदंशाच्या रुग्णांमध्ये कमालीची वाढ होत आहे. त्यामुळे नागरिकांनी सर्जकता बाळगावी. साप निघाल्यानंतर जवळच्या सर्पमित्रांना कॉल करावा, सापांना मारू नये, असे आवाहन सर्पमित्रांनी केले आहे.
तालुक्यात दोन दिवसांपासून पाऊस होत असल्याने ग्रामीण भागासह शहरी भागात असलेल्या बिळांमध्ये पाणी शिरत असल्याने बिळांमधील साप बाहेर येत आहेत. सर्वसाधारणपणे काही साप बिळांमध्ये तर काही साप अडगळीच्या ठिकाणी निवारा करून राहतात. सापाला केवळ रहायला आणि खायला मिळाले की त्यांची सोय होते. वर्षभरात महाराष्ट्रात किमान बारा ते पंधरा हजार लोकांना सर्पदंश होतो. त्यात चार ते पाच हजार लोकांना जीव गमवावा लागतो. खानदेशात विषारी सापांमध्ये नाग, मन्यार, घोणस, पुरसे या सापांचा तर बिनविषारी सर्पामध्ये चित्रक, कवड्या, धामण, दिवड, गवत्या, डुरक्या घोणस, मांडोळ व अजगर यासारख्या सापांचा वावर आहे. पावसामुळे बिळांबाहेर साप निघण्याचे प्रमाण वाढते. विशेषतः मोकळ्या प्लॉट परिसरासह नदीकाठच्या भागांमध्ये साप सध्या निघत असल्याचे स्थानिक सर्पमित्रांकडून सांगण्यात आले. त्यामुळे नागरिकांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
प्रथमोपचार महत्त्वाचे
सापांविषयी समाजात गैरसमज असल्याने सापांविषयी जनजागृती होणे गरजेचे आहे. सर्पदंश झाला म्हणजे आता मृत्यू येणारच असा समाज असल्याने अनेक जण धास्तीने जीव गमावतात. मात्र, योग्य वेळी योग्य उपचार झाले तर विषारी साप जरी चावला असेल तरी जीव वाचू शकतो. त्यामुळे साप चावल्यानंतर योग्य पद्धतीने केलेले प्रथमोपचार लाख मोलाचे ठरतात, असे येथील सर्पतज्ज्ञ राजेश ठोंबरे यांचे म्हणणे आहे. श्री. ठोंबरे हे सापांविषयी ठिकठिकाणच्या व्याख्यानांद्वारे हाच संदेश देत असतात.
सर्पदंश झाल्यास काय करावे
- सर्पदंश झाल्यानंतर घाबरून जाऊ नये.
- ज्याला साप चावला, त्याला मानसिक आधार द्यावा.
- रुग्णाला श्रम न करू देता शांत बसण्यास सांगावे.
- संर्पदशं झालेला अवयव हदयाच्या खालच्या पातळीवर ठेवावा.
- जखम हळूवारपणे जंतुनाशकाने स्वच्छ करावी.
- सर्पदंश झालेल्या भागाच्या वर व खाली आवळपट्टी बांधावी, मात्र ती घट्ट बांधू नये.
- विषारी सर्पदंशावर ‘एएसव्ही’ हेच एकमेव औषध आहे. त्यामुळे तत्काळ दवाखान्यात न्यावे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.