State bank atm
State bank atm

स्‍टेट बँकेचे एटीएमच लांबविले; चाळीसगाव येथील मध्‍यरात्रीची घटना

स्‍टेट बँकेचे एटीएमच लांबविले; चाळीसगाव येथील मध्‍यरात्रीची घटना
Published on

तरवाडे (जळगाव) : चाळीसगाव येथील खरजई रोडवरील स्टेट बँकेचे एटीएम मशीन चोरट्यांनी लंपास केल्याची घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडली. हा प्रकार सकाळी लक्षात आल्‍यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. (jalgaon-state-bank-atm-machine-robbery-in-chalisgaon-city)

चाळीसगाव येथील स्टेट बँकेचे टाकळी प्र.चा. येथील खरजई रोडवरील स्वयंवर मंगल कार्यालयासमोरील भरवस्तीतील एटीएम न फोडता पुर्ण मशीनच चोरुन नेण्यात चोरटे यशस्वी झाले. प्रकार आज बुधवार पहाटे एक ते दोनच्या सुमारास घडला. विशेष बाब म्हणजे परिसरात रोज रात्री बारा ते एक वाजेपर्यंत अनेक तरुण गप्पा मारण्यासाठी बसलेले असतात हा रस्ताही मोठ्या प्रमाणात रहदारीचा आहे. तसेच एटीएम असलेल्‍या भागात मोठ्या प्रमाणात रहिवासी वास्तव्यास असून येथील एटीएम चोरटे गायब झाले.

State bank atm
‘फोरवे’ झाला खरा पण महिनाभरात दहा जणांचा मृत्यू

सीसीटीव्‍हीत प्रकार कैद

भरवस्तीत धाडसी चोरीबाबत पोलीसांना जणू चोरट्यांनी एक प्रकारे आव्हानच दिले आहे. आतापर्यंत एटीएम फोडून रक्कम लांबवल्याच्या अनेक घटना घडल्या; मात्र आता एटीएमचे मशीनच गायब करण्याची परिसरातील ही पहिलीच घटना घडली आहे. रात्री दोन वाजेपासून चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक विजयकुमार ठाकुरवाड पथकासह परिसर पिंजून काढला. तसेच काही ठिकाणचे सीसीटिव्ही फुटेज तपासत असता या चोरीच्‍या प्रकारात दोन चारचाकी गाड्यांचा वापर केल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.

परिसरातील रहिवासी भयभीत

सरकारी स्टेट बँकेचे एटीएमच गायब होणे म्हणजे किरकोळ चोरी नाही. सर्वसाधारण घरात चोरी सहजासहजी चोरट्यांना शक्य होते. एटीएम जवळील रहिवासींना आवाज आला नसेल का? जर आवाज आला असेल तर भितीपोटी कोणीही सतर्कता दाखवू शकले नाही का? असे अनेक तर्कवितर्क व्यक्त होत आहे. या प्रकारामुळे परिसरातील नागरीकांमध्‍ये घबराट पसरली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com