मृत्यूदर रोखण्यासाठी 24 तासांत स्वॅबचा रिपोर्ट हवा : जिल्हाधिकारी अभिजित राऊत 

मृत्यूदर रोखण्यासाठी 24 तासांत स्वॅबचा रिपोर्ट हवा : जिल्हाधिकारी अभिजित राऊत 
Updated on

जळगाव : कोरोना विषाणूच्या वाढत्या संसर्गासह मृत्यूदर रोखण्यासाठी स्वॅब तपासणी अहवाल 24 तासांत प्राप्त होणे आवश्‍यक आहे. त्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी आवश्‍यक ते नियोजन करावे, अशा सक्त सूचना नवे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी आज आरोग्य यंत्रणेला दिल्या. 

जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नियुक्त जिल्हास्तरीय समन्वय समिती व नोडल अधिकाऱ्यांची आढावा बैठक जिल्हाधिकारी राऊत यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी त्यांनी आरोग्य विभागाच्या यंत्रणांसह सर्व संबंधितांना वरील सूचना केल्या. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन पाटील, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले, महापालिकेचे आयुक्त सतीश कुलकर्णी, जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्ष गोरक्ष गाडीलकर, अप्पर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप पाटोडे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी तुकाराम हुलवळे, जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सूर्यवंशी आदी उपस्थित होते. 

डॉक्‍टरांनी संवाद साधावा 
कोविड सेंटरमध्ये दाखल झालेला प्रत्येक रुग्ण लवकरात लवकर पूर्णपणे बरा होऊन त्याच्या कुटुंबीयांमध्ये आपल्याला आनंद निर्माण करता यावा. त्यास सर्व कोविड सेंटरच्या डॉक्‍टरांचे प्राधान्य असणे आवश्‍यक आहे. त्यासाठी कोविड सेंटरच्या सर्व डॉक्‍टरांनी दररोज सायंकाळी नियमितपणे व्हिडिओ कॉन्फरसिंगच्या माध्यमांतून एकमेकांशी संवाद साधावा. 

सांघिक प्रयत्नातून हरवू या..! 
जिल्हाधिकारी राऊत म्हणाले की, उपस्थित जिल्हा शल्यचिकित्सक, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांनी मनुष्यबळ, साधनसामुग्रीबाबत उपस्थित केलेल्या अडचणींवर लवकरच योग्य तो मार्ग काढण्यात येईल, असे सांगून सकारात्मक आणि सांघिक प्रयत्नांतून कोरोना विषाणूला आपण जिल्ह्यातून हद्दपार करू असा विश्वास यावेळी जिल्हाधिकारी यांनी व्यक्त केला. 

कोविड रुग्णालयात पाहणी 
जिल्हाधिकारी राऊत यांनी दुपारी कोविड रुग्णालयास भेट दिली. तेथील कामकाजाची तसेच रुग्णांवर करण्यात येत असलेले उपचार व औषधी आवश्‍यक त्या सोईसुविधा, आदीची पाहणी केली. तसेच अधिष्ठाता, डॉक्‍टर यांच्याशी चर्चा करून कोरोना कोविड सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांबाबत काय खबरदारी घेणे आवश्‍यक आहे. याची माहिती घेऊन पुढील उपचारासंबंधी योग्य ती पाऊले उचलावीत, अशा सूचना दिल्या. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com