esakal | राज्यात जळगावचा पॉझिटिव्हिटी रेट सर्वांत कमी
sakal

बोलून बातमी शोधा

 covid test

राज्यात जळगावचा पॉझिटिव्हिटी रेट सर्वांत कमी

sakal_logo
By
देविदास वाणी
जळगाव : राज्यासह जिल्ह्यात कोरोना संसर्ग प्रादुर्भाव संक्रमण वाढत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या निर्देशानुसार आरोग्य विभागाकडून संसर्ग बाधितांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींच्या शोधमोहिमेंतर्गत तत्काळ तपासणी, निदान आणि उपचार या त्रिसूत्री कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. त्यानुसार विभागासह राज्यात जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट सर्वांत कमी ५.९२ टक्के असल्याचे जिल्हा प्रशासनाच्या सूत्रांनी सांगितले.

हेही वाचा: तू मारल्यासारखं कर.. मी रडल्यासारखं करेल..!

राज्यात फेब्रुवारी मध्यापासून कोरोना प्रादुर्भाव संक्रमण साखळी खंडित करण्यासाठी सर्वच स्तरांवरून अत्यावश्यक उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात संसर्ग बाधितांसह संपर्कात आलेल्या व्यक्तींच्या रॅपिड ॲन्टिजेन चाचण्या करण्यावर भर दिला जात आहे. या चाचण्यांच्या माध्यमातून करण्यात आलेल्या सर्वेक्षणात जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट ५.९२ टक्के असल्याचे नमूद आहे.

हेही वाचा: साहेब, गाडी फिरली तरच चूल पेटते!

विभागात लोकसंख्येच्या प्रमाणानुसार दृष्टिक्षेपात पॉझिटिव्हिटी रेट
शहर -- लोकसंख्या -- पॉझिटिव्हिटी रेट

नाशिक -- ७१,४९,५८३ -- ३०.३७
नगर ---- ५०,११,८५९ --- ३५.२५
जळगाव --- ४७,२९,८९६ --- ५.९२
धुळे ---- २३,६६,७७७ --- १०.११
नंदुरबार --- १९,५८,२३४ --- २७.३८

संपादन- भूषण श्रीखंडे