रावेर हत्याकांड प्रकरणातील आरोपींच्या शोधांसाठी तीन पथक रवाना !

भूषण श्रीखंडे
Friday, 16 October 2020

नाशिक परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक यांनी देखील घटनेची माहिती घेवून पोलीस अधिक्षक डॉ. मूढें यांना तपासाच्या सुचना दिल्या. त्यानुसार पोलीस अधीक्षकांनी आरोपी शोधण्यासाठी पथकांची नमणूक केली असून ते रवाना झाले आहे. 

जळगाव ः जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील बोरखेडा रस्त्यावरील एका शेतातील घरामध्ये चार भावडांचा कुऱ्हाडीचा घाव घालून हत्या केल्याची निघृन घटना आज घडली. या घटनेचा तपास लावण्यासाठी नाशिक परिक्षात्राचे पोलिस महासंचालकाच्या सुचनेनूसार पोलिस अधीक्षक डॉ. प्रविण मुढें यांनी पोलीस दलाचे तीन पथक तयार केला असून घटनास्थळील पुरावे, फॅारेन्सीग टिम, फिंगर प्रिंट पथकाडून घटनास्थळाचे तपास करण्याचे काम सुरू आहे. तसेच आरोपीच्या शोधासाठी मध्यप्रदेश येथे एक तर दोन पथके इतर दोन ठिकाणी रवाना झाली आहे. तसेच या घटनेबाबत खासदार रक्षा खडसेंनी देखील पोलिस अधीकाऱयांशी चर्चा केली असून लवकरात लवकर गुन्हेगारांचा शोध लावण्याच्या सुचना दिल्या आहे. 

रावेर शहरालगत बोरखेडा रस्त्यावरील शेख मुस्‍तुफा यांच्या शेतात सालदार म्हणून राहणाऱ्या महताब आणि रुमली बाई भिलाला हे दांपत्य राहतात. ते आपल्या मूळ गावी मध्यप्रदेशातील गढी ( जि खरगोन ) येथे नातेवाईकाच्या दशक्रिया विधीसाठी गेले होते. घरात सईता ( वय १२ वर्ष)  रावल ( वय ११ वर्ष ) अनिल ( वय ८ वर्ष) आणि सुमन  वय ३ वर्ष ) या चौघां भावंडाचा खून कुऱ्हाडीचा घाव घालून हत्या करण्यात आली. गंभीर घडलेल्या या घटनेची माहिती मिळताच पोलिस कर्मचाऱयांसह पोलिस अधिकारी हे देखिल घटनास्थळी हजर झाले आहे. तसेच नाशिक परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक यांनी देखील घटनेची माहिती घेवून पोलीस अधिक्षक डॉ. मूढें यांना तपासाच्या सुचना तसेच आरोपी शोधण्याच्या पथकांचे नमणूक करण्याच्या सुचना दिल्या आहे. त्यानुसार पोलिस अधिक्षकांनी एसआरटी पथक, तसेच चार प्रथम दर्जाचे पोलिस निरीक्षक, फॅारेन्सीक, श्वान पथक, फिंगर प्रिंट एक्सपर्ट आदी पथकांकडून या घटनेचा तपास वेगाने पोलिसांनी सुरू केला आहे. 
घराजवळ जवळच दारूच्या रिकाम्या बाटल्या सापडल्या आहे. त्यामुळे पोलीस त्या दृष्टीकोनातून तपास करीत असून लवकरच आरोपी पोलिसांच्या जाळ्यात सापडण्याची शक्यता आहे. 

तत्काळ गुन्हेगारांचा शोध घ्या- खासदार खडसे
रावेर येथील घडलेली घटना अतिशय गंभीर असून या चिमुकल्यांच्या हत्येने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. महाराष्ट्रात गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असून याबाबत काही दिवसापूर्वी भाजपातर्फे जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले होते. या घटनेबाबत पोलीस अधिकाऱयांशी चर्चा केली आहे. या घटनेत मुलीवर अत्याचार झाल्याची शक्यता असू शकते याबाबत पोलीसांशी तशी चर्चा झाली आहे. महाराष्ट्रात होणाऱया अशा गंभीर घटना लक्षात घेवून राज्यातील कायदा व सुव्यवस्था अबधित राहण्यासाठी राज्यशासनाने याबाबत तत्काळ कठोर पावले उचलणे गरजेचे झाले आहे असे मत खासदार रक्षा खडसेंनी यांना व्यक्त केले. 

गुन्हेगारांचा शोध घेण्याचे काम सुरू- पोलिस अधीक्षक
घडलेली घटना गंभीर असून चार ही मुलांचा हत्या ही कुऱ्हाडीने झाल्याची शक्यता आहे. ही कुऱ्हाड घरातच सापडली असून याबात फॅारेन्सीक पथक, फिंगर प्रिंट, श्वान पथकाकडून तपास सुरू झाला आहे. तसेच नाशिक परिक्षत्रेचा पोलिस महानिरीक्षकांनी देखील घटनेच्या तपास कामासाठी सुचना दिलेल्या आहे. त्यानुसार पथकांची नेमणूक केली असून लवकरात आरोपींना शोधण्याचा आमचा प्रयत्न आहे असे पोलिस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतांना सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon Three squads dispatched to search for accused in raver takse live