रेशन कार्ड नाही..तरी या आणि धान्य घ्या

reshan dhanya
reshan dhanya
Updated on: 

जळगाव : जिल्ह्यात ज्या नागरिकांना कडे रेशन कार्ड नसेल अशांना उद्यापासून (ता. 1 जून ) धान्य वाटप होणार आहे. जिल्ह्यात कार्ड नसलेले 2 लाख 16 हजार 297लाभार्थी आहेत. अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी सुनिल सूर्यवंशी यांनी दिली. 
कोरोना मुळे अनेक मजुर यांना रोजगार नाही, त्याची उपासमार होते. अनेक गरिबांना रेशन कार्ड नाही. अशांना विना कार्ड तांदूळ व चणा देण्याचे शासनाने जाहीर केले होते. त्याबाबत कार्ड नसलेल्या नागरिकांची यादी प्रत्येक तहसील कार्यालयात तयार करण्यात आली. त्या नुसार कार्ड नसलेल्या नागरिकांना प्रति व्यक्ती 5 किलो तांदूळ व प्रति कुटुंब 1किलो चा दिला जाणार आहे. रेशन कार्ड नसलेल्या नागरिकांनी जवळच्या रेशन दुकानदाराकडे तांदूळ व चणा यांची मागणी करायची आहे. 

लोकप्रतिनिधी कडून पत्र घ्या 
जर कोणाकडे रेशन कार्ड नसेल व त्याला धान्य मिळाले नाही तर त्यांनी त्या एरिया तील नगरसेवक, आमदार लोकप्रतिनिधी यांचे पत्र आणावे. त्यात मी या व्यक्ती ला ओळखतो व त्या कडे रेशन कार्ड नाही असे पत्र रेशन दुकानदाराला द्यावे. त्या द्वारे तो धान्य देईल. 

तर कारवाई 
ज्यांच्या कडे रेशन कार्ड आहे, त्यांनी मात्र या योजनेचा लाभ घेऊ नये. तसे सापडले तर त्यावर कारवाई करू असे पुरवठा अधिकारी सूर्यवंशी यांनी सांगितले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Nandurbar bribery case
Jalgaon Engineer Incident
Jalgaon Mother and Son Case
Girna Dam Water Storage
Marathi News Esakal
www.esakal.com