esakal | अरे बापरे झेंडूचे फुल दोनशे रुपये किलो; नकली माळांना पसंती
sakal

बोलून बातमी शोधा

अरे बापरे झेंडूचे फुल दोनशे रुपये किलो; नकली माळांना पसंती

झेंडूची आवकही अधिक प्रमाणात नव्हती. व्यापाऱ्यांनी झेंडूंची मागणी पाहता दर तेजी ठेवले. दुपारी चारनंतर मात्र दरात उतरण झाली होती.

अरे बापरे झेंडूचे फुल दोनशे रुपये किलो; नकली माळांना पसंती

sakal_logo
By
भूषण श्रीखंडे

जळगाव ः दिव्यांचा सण, आनंदाचा, प्रकाशाचा सण म्हणून दिवाळी साजरी करतो. झेंडूची फुले खरेदीसाठी आज बाजारात नागरिकांची झुंबड उडाली होती. मात्र झेेडुच्या फुलांना दोनशे रुपये किलो भाव असल्याने भाव एकेूनच ग्राहकांचे होश उडत होते. तर नकली झेेडूच्या फुलांच्या माळा घेण्याकडे नागरिकांची  एकच झुंबड उडालेली देखील बाजारात दिसत होती.


लक्ष्मीपूजनाला झेंडूच्या फुलांनी घरासह दुकाने, फ्लॅट, बंगले सजविले जातात. वाहनांनाही झेंडूच्या फुलांचेच पुष्पहार घालतात. यामुळे झेंडूला आज प्रचंड मागणी होती. सकाळपासूनच झेंडूचा दर एकशे सत्तर ते दोनशे रुपयापर्यंत होता. बाजारात आज झेंडूची आवकही अधिक प्रमाणात नव्हती. व्यापाऱ्यांनी झेंडूंची मागणी पाहता दर तेजी ठेवले. दुपारी चारनंतर मात्र दरात उतरण झाली होती. यंदा अतिवृष्टीने झेंडूच्या उत्पादनात घट झाली होती. 

दोनशे रुपये किलो भाव

यंदा राज्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडला त्यामुळे शेतीसह फुल शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यात झेंडूच्या फुलांचे देखील मोठे नुकसान झाले असून उत्पादनात मोठी घट झाली. त्यात प्रचंड मागणीमूळे झेंडूच्या फुलांचा भाव दोनशे रुपयापर्यंत गेल्याने मात्र उत्पादकांमध्ये आनंद होता.

नकली माळांना पसंती

झेंडूच्या फुलांचा भाव दसऱयामध्ये देखील वाढलेल्या असल्याने नकली झेंडूच्या फुलांच्या माळा घेण्यासाठी नागरिकांचा गर्दी होती. माळा चाळीस रुपये पासून ते शंभर रुपयांच्या माळा खरेदीसाठी नागरिकांची ओढ होती.