esakal | अश्‍लील व्हिडओक्लिपद्वारे ब्लॅकमेलिंग...ते दोघेही स्वतःहून पोलिसात हजर 
sakal

बोलून बातमी शोधा

videoclip

दोघांचे अश्‍लील व्हिडीओ क्लिप काढले होते. पिडीतेने तेजसशी संपर्क तोडल्यावर चेतन याने तिला मोबाईल मधील क्लिप दाखवत ब्लॅकमेलींग सुरु केले. नंतर दोघांनी वर्षभर या पिडीतेवर अत्याचार केले होते.गुन्हा दाखल झाल्यानंतर देाघांनी पळ काढल्याने राजकीय वातावरण तापले होते. 

अश्‍लील व्हिडओक्लिपद्वारे ब्लॅकमेलिंग...ते दोघेही स्वतःहून पोलिसात हजर 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

जळगाव : दहावीच्या विद्यार्थिनीला प्रेम जाळ्यात ओढून एकाने लैंगिक अत्याचार केले. दोघांच्या पाळतीवर असलेल्या मित्राने या अत्याचाराचे मोबाईलमध्ये चित्रीकरण करून दोघा भामट्यांनी नंतर या मुलीला वर्षभर ब्लॅकमेलिंग करून अत्याचार सुरू केला होता.राष्ट्रवादी कॉग्रेसच्या महिला पदाधिकारी महिलेचा मुलगा तेजस दिलीप सोनवणे व चेतन पीतांबर सेानवणे असे दोघेही संध्याकाळी शनिपेठ पेालिसांना शरण आले. 

दहावीत शिक्षण घेणाऱ्या पिंकीवर ( काल्पनिक नाव ) गल्लीतील राष्ट्रवादी कॉग्रेसच्या माजी महिला पदाधिकाऱ्याचा मुलगा तेजस दिलीप सोनवणे (वय-२०) याने मैत्री व नंतर प्रेमाचे नाटक करून तिच्यावर अत्याचार केला होता. दहावीचा निकाल घेण्यासाठी(२८ फेब्रुवारी २०१९) आलेल्या पिंकीला निकाल घेतल्यानंतर तेजस व त्याचा साथीदार चेतन सेानार यांनी गाठले. तेजसने दुचाकीवर बसवून कोल्हेहिल्स परिसरात नेत अत्याचार केला. पाळतीवर असलेला त्याचा मित्र चेतन सोनार याने दोघांचे अश्‍लील व्हिडीओ क्लिप काढले होते. पिडीतेने तेजसशी संपर्क तोडल्यावर चेतन याने तिला मोबाईल मधील क्लिप दाखवत ब्लॅकमेलींग सुरु केले. नंतर दोघांनी वर्षभर या पिडीतेवर अत्याचार केले होते.गुन्हा दाखल झाल्यानंतर देाघांनी पळ काढल्याने राजकीय वातावरण तापले होते. 

चेापड्यात होते लपून 
गुरुवार(ता.१३) रेाजी शनीपेठ पोलीस ठाण्यात दोघा भामट्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाल्यावर देाघा भामट्यांनी धूम ठोकली. देाघेही चोपडा येथे नातेवाईकाकडे आठ दिवसांपासून दडून बसले होते. पोलीस निरीक्षक विठ्ठल ससे यांच्या पथकातील दिनेशसींग पाटील, परीस जाधव, हकीम शेख, अभिलाषा मनोरे संशयिताच्या मागावर होते.आज संध्याकाळी दोघेही संशयित पोलिसांना हजर झाले.

loading image
go to top