
औषधी दुकानांवर प्लॅस्टीकचे पडदे लावून देखिल दुकानांमधे धुळ, मातीचा शिरकाव होतोच. काऊंटरवर, इतरत्र खूप धुळ बसते. दिवसभर साफसफाई करुन सुदधा थोडयाफार प्रमाणास धुळ राहतेच.
जळगाव ः राष्ट्रीय महामार्गावर कच्चया रस्त्यावर धुळ उडूनये म्हणून पाणी मारले जाते. मात्र शहरातील सर्वच रस्त्यावर धुळ उडत असल्याने मेडीकल दुकानांना धुळीचा सामना करावा लागत आहे. धुळ असल्याचे दिसल्यास अन्न औषध प्रशासनाचे अधिकारी कारवाइचा बडगा उचलतात.
वाचा- प्रेम संबंधाच्या संशयावरून भर चौकात तरुणांवर ब्लेडने वार -
शहरातील रस्त्यावर धुळ उडू नये म्हणून महापालिकेने सर्वच रस्त्यावर पाणी मारावे, अन्यथा मेडीकल दुकाने बंद ठेवण्याचा इशारा जळगाव जिल्हा मेडीकल डिलर्स असोसिएशनचे अध्यक्ष सुनिल भंगाळे, सचिव
अनिल झंवर यांनी जिल्हाधिकारी अभिजीत राउत यांच्याकडे निवेदनाद्वारे दिला आहे.
तर मेडीकल बंद ठेवू
जिल्हयात सर्वत्र रस्त्यांची खूप मोठया प्रमाणात दूर्दशा झालेली
आहे. त्यामुळे औषधी दुकानांवर प्लॅस्टीकचे पडदे लावून देखिल दुकानांमधे धुळ, मातीचा शिरकाव होतोच. काऊंटरवर, इतरत्र खूप धुळ बसते. दिवसभर साफसफाई करुन सुदधा थोडयाफार प्रमाणास धुळ राहतेच. यावेळी अन्न, औषध प्रशासनाकडून औषधी निरीक्षक दुकानात निरीक्षण करण्यास येतात व ते नेमके धुळ बघून लागलीच त्याबाबतचा पहिलाच शेरा मारतात व कारवाई करतात. वारंवार प्रशासनाच्या कारवाईस तोंड देण्यापेक्षा मग मेडीकल बंद का ठेवू नये ?
वाचा- अंडरपासबाबत नागरिक ‘नही’च्या कार्यालयावर धडकले
धुळीमुळे सर्दी, खोकला व दम्याचे पेशंट वाढून
नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. बाहेरील महामार्गावर टॅंकरने पाणी मारुन धूळ बसवली जाते. तसेच शहरातही महापालीकेस आदेश देवून प्रमुख औषधी दुकानांच्या भागात टॅंकरने पाणी मारुन धुळ बसविण्यात यावी. जेणेकरुन धुळीचे प्रमाण कमी होवून जीवनावश्यक औषधी योग्य रित्या सांभाळता येतील व नागरिकांचे आरोग्यही सांभाळता येईल, अशी मागणी संघटनेचे अध्यक्ष सुनील भंगाळे, सचिव अनिल झंवर यांनी केली आहे.
संपादन- भूषण श्रीखंडे