शेतकऱ्यांवर नवीन संकट; उसावर पांढरी माशीचा प्रादुर्भाव! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

sugarcane crop

शेतकऱ्यांवर नवीन संकट; उसावर पांढरी माशीचा प्रादुर्भाव!

गणपूर (ता चोपडा): चोपडा तालुक्यात उसाच्या पिकावर (sugarcane crop) गेल्या आठवड्यापासून पांढऱ्या माशीचाम(White fly) प्रादुर्भाव दिसून आला आहे. तालुक्यात सुमारे तीन हजार हेक्टर क्षेत्रावर गेल्या वर्षात ऑक्टोबर ते जानेवारी दरम्यान लागवड (Planting) करण्यात आलेल्या उसाचे पीक आता आठ ते दहा फुटाचे झाले असून आठ दहा पेऱ्यांवर आहे.

(white fly disease on sugarcane crop farmers worried about )

जळगाव जिल्ह्यासह चोपड्या तालुक्यात अनेक ठिकाणी उसाची शेतीची लावगड केली जाते. त्यात चोपड्या तालुक्यातील उसाच्या पिकांवर पाऊस नसल्यामुळे पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव वाढला आहे. उसाचे शेतकरी आधीच पाऊस नसल्याने चिंतेत असतांना त्यांच्यापुढे आता नविन पांढऱ्या माशीचे संकट आले आहे.

पाऊस नसल्याने वाढली चिंता

जुन महिन्याच्या सुरवातीला पाऊस आला मात्र पावसाने आता दडी मारली आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग आता चिंतेत असून अनेक ठिकाणी पेरण्या झाल्या आहे. तर पिके वाचविण्यासाठी शेतऱ्यांना आता प्रयत्न करावे लागत आहे. त्यामुळे शेतकरी आता पावसाच्या प्रतिक्षेत आहे.

पाउस पडल्यास प्रादुर्भाव कमी होईल

यंदा चांगल्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवीला. त्यामुळे शेतकऱ्यामध्ये उत्साहाचे वातवरण होते. जूनच्या सुरवातीला पाऊस देखील आला परंतू पाऊसाने विश्रांती घेतली असून उसाच्या पिकाला पाणी नसल्यामुळे पाण्याचा ताण पांढऱ्या माशीसाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे या माशिचा उसावर प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढू लागला आहे. त्यामुळे जोरदार पाऊस येण्याची खुप गरज असून पाऊस आल्यास उसावरील पांढरी माशीचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होईल.

कारखाना बंद मुळे अडचण

सध्या कारखाना बंद असल्यामुळे क्रायसोपरला कॉर्नियाची अंडी आणून ती उसावर सोडणे गरजेचे झाले आहे. मात्र ही अंडी इंदोर, नागपूर, बेंगलोर येथून आणावी लागणार असल्याने त्यांची मोठी मागणी नोंदवावी लागणार आहे.

लागवडीत वाढ होईल..

चोपडा साखर कारखाना बंद असल्यामुळे चोपडा उस लागवडीचे क्षेत्र घटले होते. मात्र हा कारखाना यावर्षी सुरू होण्याचे प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे जळगाव जिल्ह्यात उस लागवडीचे प्रमाण यंदा वाढण्याची शक्यता आहे.