esakal | सायंकाळसाठीचे साहित्‍य आणून घरी ठेवले; नंतर आली बातमी त्‍याच्या मृत्‍यूची
sakal

बोलून बातमी शोधा

young boy suicide railway track

दुपारी चायनीजच्या गाडीसाठी लागणाऱ्या साहित्याची खरेदी केली आणि साहित्य घरी ठेवले तो घराबाहेर पडला. त्यानंतर परत आलाच नाही.

सायंकाळसाठीचे साहित्‍य आणून घरी ठेवले; नंतर आली बातमी त्‍याच्या मृत्‍यूची

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जळगाव : चायनीज विक्रीसह केटरर्सचे काम करणाऱ्या तरुणाने बजरंग बोगद्याजवळ रेल्वेखाली झोकून देत आत्महत्या केल्याची घटना दुपारीउडघडकीस आली. 
पिंप्राळा हुडको परिसरातील दीक्षाभूमीनगरातील अविनाश शैलेंद्र सोनवणे (वय २३) हा आई, दोन विवाहित भावांसह वास्तव्यास आहे. अविनाश याची पिंप्राळा हुडकोच्या रिक्षा स्टॉपवर चायनीजची हातगाडी असून तो विविध समारंभांत केटर्सचे काम करुन कुटुंबाला हातभार लावत होता. अविनाशने दुपारी चायनीजच्या गाडीसाठी लागणाऱ्या साहित्याची खरेदी केली आणि साहित्य घरी ठेवले तो घराबाहेर पडला. त्यानंतर परत आलाच नाही. 

मृतदेहाजवळ दुचाकी 
दुपारी दोन वाजेच्या सुमारास अविनाशचा मृतदेह बजरंग बोगद्याजवळ आढळून आला. याठिकाणी त्याची दुचाकी देखील आढळून आल्याने पोलिसांनी त्याची ओळख पटविली जात होती. यावेळी दुपारी चार वाजता अविनाश याची ओळख पटविण्यात यश आहे. घटनेची माहिती उप-स्टेशन प्रबंधक आर. के. पालरेचा यांनी लोहमार्ग पोलिसांना दिल्यानंतर लोहमार्ग पोलीस सचिनकुमार भावसार, किशोर पाटील, अनिल नगराळे यांनी घटनास्ळी धाव घेत पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आला. 

मृत्यूचे कारण गुलदस्त्यात 
अविनाशचा स्वभाव मनमिळावू असल्याने त्याने कोणत्या कारणामुळे टोकाचे पाऊल उचलले असावे, याबाबत अद्याप समजू शकले नाही. त्याच्या या निर्णयामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात होती. 
 

loading image
go to top