esakal | बापाच्या डोळ्यादेखत..मुलाचे गेले प्राण
sakal

बोलून बातमी शोधा

Death

बापाच्या डोळ्यादेखत..मुलाचे गेले प्राण

sakal_logo
By
रईस शेख्जळगाव : महेश ऊर्फ डेम्या याच्यावर सपासप चॉपरचे वार होवुन तो खाली कोसळला अन्‌ त्याचे वडील वासुदेव पाटील पोहचले..डेम्याने अखेरचे शब्द बापाला सांगीतले अन्‌ डोळे मिटले अशी मन हेलावणारी घटना काल वासुदेव पाटील व त्यांच्या कुटूंबीयांनी (Family)अनुभवली. मुलगा महेश ऊर्फ डेम्याच्या खुन (Murder) प्रकरणात चौघांवर गुन्हा दाखल करण्यात येवुन पोलिसांनी (Police) एकाला अटक केली आहे. मुख्य संशयीत जखमी असून इतर देाघे फरार झाले आहेत. ( young man stabbed to death in jalgaon)

हेही वाचा: रावेरमध्ये नकली नोटा चलणात आणणारे रॅकेटवर पोलिसांची धडक कारवाई

खुनाच्या गुन्ह्यात पॅरोलवर बाहेर असलेल्या बापू राजपुत आणि महेश वासुदेव पाटील ऊर्फ डेम्या या देाघांचे गुन्हेगारी भाऊ बंदकीचे नाते. म्हणून सेाबत उठबस होती. डेम्याच्या ओळखीच्या नवख्या गुन्हेगारांसमोर बापूने आपल्याला थोडी इज्जत द्यावी म्हणुन दोघांमध्ये वाद झाले होते. याच वादाचे पर्यावसन कालच्या खुनाच्या घटनेत झाले. खोटेनगर पाण्याच्या टाकी खाली दारु पेण्यास बसलेले असतांना महेश ऊर्फ डेम्या तेथे धडकला. बापू राजपुत याच्यावर वारही केला मात्र, तो चुकला अन्‌ बापू आणि इतरांच्या प्रतिहल्ल्यात डेम्याचा खुन झाला.

हेही वाचा: दौरा एक..नेते, गटबाजी अन्‌ प्रश्‍नही अनेक!

नेहमीच्याच हाणामाऱ्या...
मयत महेशचे वडील वासुदेव पाटील यांच्या तक्रारी प्रमाणे, दोन दिवसांपुर्वीच गुरुवार रात्री अकरा वाजता बापू संतोष राजपुत, मयुर नरेंद्र पाटील असे तिघे मुलगा महेश ऊर्फ डेम्याला शेाधण्यासाठी घरी आले होते. नेहमीचा प्रकार असल्याने त्याकडे काही लक्ष दिले नाही. मात्र, शनिवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास महेश ऊर्फ डेम्या, बापू संतोष राजपुत, मयुर नरेंद्र पाटील, गजेंद्र ऊर्फ गोलू युवराज परदेशी , ईश्वर अशोक पाटील नेहमी प्रमाणे, पाण्याच्या टाकीखाली दारु पेत बसलेले असतांना वाद होवुन किंचाळ्या ऐकू आल्याने महेशच्या वडीलांनी धाव घेतली. तर, मुलगा महेशला बापू व इतर चाकूने सपासप वार करत होते. आरडाओरड केल्याने त्यांनी तेथून पळ काढला. जखमी महेशने वडील वासुदेव यांना बापू व इतरांची नावे सांगीतली. अन्‌ थोड्याच वेळात डोळे बंद करून शांत झाल्याचे तक्रारीत नमुद आहे.

हेही वाचा: पावसाने ओढ दिल्याने उडीद, मूग, सोयाबीनची पेरणी गेली वाया

एकास अटक व कोठडी
मयत महेशचे वडीलांच्या तक्रारीवरुन तालुका पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. यातील संशयित आरोपी गजेंद्र उर्फ गोलु युवराज सुर्यवंशी याला पोलीसांनी अटक केली. तर, मुख्य संशयीत बापू राजपुत जखमी असून तो उपचार घेत आहे. उर्वरीत दोघेही फरार झाले आहे. आज संशयित आरोपी गजेंद्र सुर्यवंशी याला जिल्हा न्यायालयात न्या. व्ही. एस. जोशी यांच्या न्यायालयात हजर केले असता पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

loading image