१८ वर्षांपासून अनधिकृत वापर; जिल्‍हा परिषदेने गाळे घेतले ताब्‍यात

१८ वर्षांपासून अनधिकृत वापर; जिल्‍हा परिषदेने गाळे घेतले ताब्‍यात
jalgaon zp
jalgaon zp
Updated on: 

जळगाव : शहरातील पुष्‍पलता बेंडाळे चौकातील जिल्‍हा परिषद मालकिचे गाळे अनेक वर्षांपासून भाडे थकवून व्‍यापारी अनधिकृत वापर करत होते. मात्र जिल्‍हा परिषदेचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांच्‍या आदेशानुसार पोलिस बंदोबस्‍तात १८ गाळे खाली करून ताब्‍यात घेण्याची कारवाई जि.प. प्रशासनाने आज केली. (jalgaon-zilha-parishad-Unauthorized-use-for-18-years-Zilla-Parishad-took-the-floor)

jalgaon zp
सावद्याची कन्या झाली अब्जाधीश; तंत्रज्ञान उद्योजिकेची प्रेरणादायी कथा

जळगाव शहरातील पुष्पलता बेंडाळे चौकात जिल्हा परिषदेच्या मालकीचे व्‍यापारी संकुल आहे. २००३ पासून हे गाळे व्‍यापारी अनधिकृत वापरत होते. गाळ्यांच्‍या वापरापोटी त्‍याचे भाडे देखील गाळेधारकांकडून दिले जात नव्‍हते. शिवाय व्‍यापारी गाळे खाली करून देत नव्‍हते. यामुळे सदर प्रकरण कोर्टात सुरू असताना जिल्‍हा परिषदेकडून निकाल लागल्‍यामुळे गाळे खाली करून देण्याचे आदेश कोर्टाने दिले होते. त्‍यानुसार व्‍यापारी संकुलातील १८ गाळे जिल्हा परिषदेचे सीईओ डॉ. बी. एन. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सामान्‍य प्रशासन विभागाचे उपमुख्‍य कार्यकारी अधिकारी कमलाकर रणदिवे, बांधकाम विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता नंदू पवार, उपअभियंता सतीश सिसोदिया, जळगावचे गटविकास अधिकारी शशिकांत सोनवणे, जि.प.चे कायदेशिर सल्लागार ॲड. हरुल देवरे यांच्यासह पोलीस बंदोबस्तात गाळे खाली करुन ताब्यात घेण्याची कारवाई आज जि. प. प्रशासनाने केली.

असे आहे प्रकरण

सन २००३ पासून जि.प. मालकीचे १८ गाळे अनाधिकृतपणे गाळेधारकांनी ताब्यात ठेवले होते. या गाळ्यापोटी जिल्हा परिषदेला भाडे न देता गाळे खाली करीत नव्हते. याबात वारंवार सूचना देवूनही गाळेधारक दाद देत नसल्याने त्यांना नोटीस पाठविण्यात आली होती. यासंदर्भात जि.प.ने न्यायालयात दावा दाखल केला होता. याबाबत न्यायालयाने जिल्हा परिषदेच्या बाजूने निकाला दिला होता. जिल्हा परिषदेने कायदेशीर लढाई जिंकूनही गाळेधारक जुमानत नसल्याने अखेर जि.प.ने पोलीस बंदोबस्तात १८ गाळे ताब्यात घेण्याची कार्यवाही आज केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Nandurbar bribery case
Jalgaon Engineer Incident
Jalgaon Mother and Son Case
Girna Dam Water Storage
Marathi News Esakal
www.esakal.com