मंदिरे उघडण्याबाबत सरकारचे आडमुठे धोरण- गिरीश महाजन

भारतीय जनता पक्षातर्फे शंखनाद आणी घंटानाद आंदोलन करून राज्यसरकारचा तीव्र निषेध करण्यात आला.
MLA Girish Mahajan
MLA Girish Mahajan


जामनेर: राज्यभरात हॉटेल-बार सर्रासपणे खुले करण्यात आले, सत्ताधारी आघाडी सरकारमधील (Mahavikasaghadi government) पदाधीकारी-मंत्री कार्यकर्त्यांची गर्दी जमवुन कार्यक्रम घेत आहेत,तर दुसरीकडे मात्र मंदिरे (Temple) उघडण्याला परवानगी नाही,या परीस्थितीला केवळ सरकारचे आडमुठे धोरण कारणीभुत असल्याचा आरोप माजी मंत्री तथा आमदार गिरीश महाजन (MLA Girish Mahajan) यांनी केला. भावीक-भक्तांसाठी मंदिरे खुली करण्यात यावी यासाठी भारतीय जनता (BJP) पक्षातर्फे शंखनाद आणी घंटानाद आंदोलन करून राज्यसरकारचा तीव्र निषेध करण्यात आला.

MLA Girish Mahajan
पितापुत्रास नडली स्टंटबाजी..हातात रायफल आणि तलवार

जामनेर शहरातील भाजीमंडई जवळील प्रसिद्ध हनुमान मंदिर आवारात आयोजीत आंदोलनावेळी माजीमंत्री गिरीश महाजन बोलत होते. राज्यसरकारने भावीक-भक्तांना कोवीड नियमांचे पालन करून मंदिरामधे जाण्यासाठी परवानगी दिली नाही तर आम्ही आमच्या पद्धतीने मंदीरे खुली करून देऊ, त्यासाठी राज्य शासनाच्या ईशाऱ्यावर प्रशासनाने आमच्यावर गुन्हे दाखल केले तरी हरकत नाही, मात्र मंदिर आम्ही खुली करून देणारच असा ईशाराही श्री महाजन यांनी यावेळी आपल्या मनोगतात आघाडी सरकारला दिला.

MLA Girish Mahajan
खड्डेमय रस्ते प्रश्नी जळगावात राष्ट्रवादी आक्रमक..

यांचा होता सहभाग..

आंदोलनाप्रसंगी कार्यकर्ते-पदाधिकाऱ्यांनी राज्यसरकारच्या निषेधाच्या घोषणा दिल्या.भाजपचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत बावीस्कर, तालुका शिक्षणसंस्थेचे सचिव जितु पाटील,जेष्ठनेते छगन झाल्टे, उपनगराध्यक्ष प्रा शरद पाटील,गटनेते डॉ प्रशांत भोंडे,महेंद्र बावीस्कर,शहराध्यक्ष आतीष झाल्टे, सुहास पाटील,श्रीराम महाजन,बाबुराव हिवराळे,देवराम चौधरी,दत्तात्रय सोनवणे,रवींद्र झाल्टे,सुभाष पवार,हेमंत वाणी,प्रमोद वाघ,निलेश चव्हाण,उल्हास पाटील,अजय नाईक,जालमसींग राजपुत,स्वियसहायक दिपक तायडे,सदाशीव शिंदे आदी कार्यकर्ते-पदाधीकारी-नागरीक मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com