esakal | प्रकाशापासून दूर असलेल्या झोपड्या युवकांनी दिवा लावून उजाळल्या !
sakal

बोलून बातमी शोधा

प्रकाशापासून दूर असलेल्या झोपड्या युवकांनी दिवा लावून उजाळल्या !

दिवाळीच्या या शुभ दिवशी तरी त्यांच्या झोपड्या मधे प्रकाशचा दिवा लागावा या हेतुने येथील तरुणानि हा उपक्रम हाती घेत गेल्या पाच वर्षापासून हा उपक्रम केला जात आहे.

प्रकाशापासून दूर असलेल्या झोपड्या युवकांनी दिवा लावून उजाळल्या !

sakal_logo
By
विलास जोशी

वाकोद ः अभिनव दिवाळी ज्यांचे घरात अंधार आहे त्यांचे कडे जाऊन त्यांचे आयुष्यात प्रकाश पर्व आनले. हा स्तुत्य उपक्रम केला तो वाकोद येथील युवक तसेच पोलिस पाटील संतोष देठे यांच्या संकल्पनेतून व् सुरेश जोशी विलास जोशी व् मित्र परिवार तसेच शांताई फाउंडेशन अखिल भटका जोशी समाज सेवा संघ जळगाव व् पहुर पोलिस ठाणे, वाकोद पत्रकार संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने उदयास आला.

वाचा- पुण्यावरून दिवाळीला घरी येत होता, दुदैवी घटनेचा निरोप येताच गावावर पसरली शोककळा

हा उपक्रम प्रकाशा पासून कोसो दूर असलेल्या आदिवाशी पारधी समाजाच्या लोकात जाऊन दिवाळी साजरी करुण त्यांची दिवाळी प्रकाशमय करण्याचा चांगला उपक्रम  पाहायला मिळाला यावेळी पहुर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राहुल खताळ पोलिस उपनिरीक्षक श्री देवढे पोलिस पाटिल संतोष देठे ग्रा प सदस्य सुरेश जोशी अखिल भटका जोशी समाज सेवा संघाचे जिलाध्यक्ष विलास जोशी शांताई फाउंडेशनचे अध्यक्ष विशाल जोशी गजानन जोशी नरेंद्र पाटिल(मेडिकल) सिनेकलाकार कृष्णा जोशी विलास जाधव तुषार खराट अजय जोशी आदित्य पाटिल प्रेम जोशी रमेश टेलर आदि उपस्थित होते 

झोपड्यामध्ये उजळला प्रकाश 
आपले घर दार सोडून केवळ पोटाची खळगी भरण्यासाठी रानोराण भटकंती करणारा पारधी समाजाचे येथून जवळच असलेल्या जांभोळ शिवारत जवळपास चाळीस ते पन्नास कुटुंब पालाच्या घरात गेल्या अनेक वर्षापासून याच परिसरात वास्तव्यस आहे त्यांचा निवारा जंगलच असतो कुठलीही विज नाही राहायला घर नाही अश्या कठीण परिस्थितीत ते आपली जीवन चर्या चलवित असतात आशा कुटुंबात जाऊन दिवाळी साजरी करुण किमान दिवाळीच्या या शुभ दिवशी तरी त्यांच्या झोपड्या मधे प्रकाशचा दिवा लागावा या हेतुने येथील तरुणानि हा उपक्रम हाती घेत गेल्या पाच वर्षापासून हा उपक्रम केला जात आहे.


या परिसरातील पन्नास कुटुंबीएसोबत जाऊन त्यांच्या सोबत त्यंच्याच् झोपड़ित पनती लाऊन तेथील सर्व लहान थोराणां दिवाळी फराल वाटून त्याना दीपवालीच्या शुभेच्छा दिल्या या प्रसंगी पहूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राहुल खताळ यांच्या हस्ते येथील मुलांना फराळ वाटप केले त्यांच्यासमवेत अनंदहि साजरा केला हा एक वेगळाच आनंद अनुभूति असल्याचे मत श्री खताळ यानी व्यक्त केले या उपक्रमासाठी पहुर पोलिस ठाणे जैन फ़ार्म वाकोद बीकानेर मिठाई पहुर यांचे अनमोल सहकार्य लाभले.

संपादन- भूषण श्रीखंडे