वडिलांच्या अस्‍थिची राख नदीत नव्हे तर पसरविली शेतात

सतिश बिऱ्हाडे
Monday, 19 October 2020

अंत्यसंस्कार केल्यानंतर त्यांच्या चिंतेची राख नदी किंवा इतर ठिकाणी टाकता पर्यावरण समतोल राखण्यासाठी ती राख ही त्यांच्या मालकीच्या शेतात पसरवून त्यावर झाडे लावण्यात आली.

तोंडापुर (जळगाव) : हिंदू संस्कृतीत व्यक्ती मेल्यानंतर त्याच्यावर अंतिम संस्कार केले जातात. त्‍यानंतर त्याला मुक्ती मिळावी; म्हणून त्याच्या अस्थी नदीत विसर्जित करण्यात येत असतात. परंतु अशा प्रथा दूर सारून कुंभारी बु. येथील साळवे परिवाराने वडीलांच्या अस्‍थि विसर्जित न करता ती राख शेतात पसरवून तेथे वृक्षारोपण केले. 

कुंभारी बु. येथील पंढरी साळवे यांचा मृत्‍यू झाल्‍यानंतर त्‍यांच्यावर अंत्‍यसंस्‍कार करण्यात आले. दुसऱ्या दिवशी अस्‍थी जमा करून घेतल्‍या. त्‍यांचा मुलगा प्रभाकर साळवे हे सामाजिक कार्यकर्ते आहेत. यामुळे त्‍यांनी घरात सर्वांशी चर्चा करून अस्‍थी विसर्जन न करण्याचे निश्‍चित केले. तर अस्‍थींची राख शेतात पसरवून त्‍यावर वडीलांच्या नावाने झाडे लावण्याचा मानस व्यक्‍त केला. 

नेहमी ते आठवणीत राहतील
कुंभारी बु येथील सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर साळवे त्यांचे वडील पंढरी साळवे यांचे १० ऑक्‍टोंबर २०२० ला अल्पशा आजाराने निधन झाले. विशेष तारीख असलेल्‍या दिवशी त्‍यांचे निधन झाल्‍याने गावकरी व मित्र परिवाराकडून त्यांचे अंत्यसंस्कार केल्यानंतर त्यांच्या चिंतेची राख नदी किंवा इतर ठिकाणी टाकता पर्यावरण समतोल राखण्यासाठी ती राख ही त्यांच्या मालकीच्या शेतात पसरवून त्यावर झाडे लावण्यात आली. जेणे करून झाड पाहून त्यांची नेहमी आठवण येईल आणि पर्यावरणाला देखील या गोष्टीचा फायदा होईल झाडे लावा झाडे जगवाचा संदेश त्याच्या या कार्यात दिसून आला. 

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jamner father dead and ashes of the bones are scattered in the fields