कर्जबाजारी, नापिकीला तो कंटाळला; आणि त्याने कवटाळले मृत्यूला ! 

गजानन खिरडकर
Thursday, 17 September 2020

मागील वर्षी अतिवृष्टीमुळे कपाशीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते व त्यानंतर आलेली कपाशी सुद्धा कमी भावात विकावी लागली.

तोंडापूर जामनेर ः तळेगाव शेळगाव येथे बेचाळीस वर्षिय शेतकऱयाने स्वतःच्या शेतात विष प्राशन करून आत्महत्या केल्याचि  घटना घडली आहे .घटनेची जामनेर पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मृत शेतकरी प्रभाकर डोळसे यांच्या पश्चात पत्नी मुलगा वय १३ वर्ष मुलगी ७ वर्ष आई व दोन भाऊ असा परिवार असून त्यांच्यावरती शेतीचे कर्ज असल्याचे त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींनी सांगितले. तसेच मागील वर्षी अतिवृष्टीमुळे कपाशीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते व त्यानंतर आलेली कपाशी सुद्धा कमी भावात विकावी लागल्याने त्यामुळे कर्जबाजारी झालेले व नापिकीला कंटाळलेले प्रभाकर डोळसे यांनी शेवटी मृत्युला कंवटाळले व आत्महत्या केली.

मृतदेह कुजलेल्या अवस्थेत

शेतकऱ्याचा स्वतः च्या शेतात कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला त्यामुळे घटनास्थळावरच डॉ. हर्षल चांदा यांनी मृतदेहाचे शवविच्छेदन केले .सदर घटनेचा तपास पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे जामनेर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास  पोलीस काँ संजय पाटील ,नाईक ,किशोर परदेशी करीत असून संजय पाटील रामदास कुंभार राहुल पाटील आदी करीत आहेत.

 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jamner Fed up with debt and barrenness, farmers commit suicide