सरपंच, उपसरंपच पदासाठी पाहिले स्वप्न; पण झाला अजब प्रकार आणि झाले 'घर के ना घाटके' 

सरपंच, उपसरंपच पदासाठी पाहिले स्वप्न; पण झाला अजब प्रकार आणि झाले 'घर के ना घाटके' 

तोंडापूर : जामनेर तालुक्यातील तोंडापूर पासून जवळ माडवे बु. गृप ग्रामपंचायत निवडणूकीत 9 सदस्य संख्या आहे. तर बहुमतासाठी पाच सदस्य संख्याची आवशक्ता असते. परंतू तीन एका पक्षातील तीन सदस्यांना सोबत घेवून सरपंच व उपसंरपच बनण्याचे स्वप्न पाहून सदस्यांना पळविले. परंतू आपल्याला संधी मिळत नसल्याने पळून गेलेल्या सदस्यांनी मारोतीवर शपथ मोडन्याचा अजब प्रकाराची चर्चा परिसरात मोठ्या प्रमाणात आहे.  

माडवे बु गावाचा गृप ग्रामपंचायत मध्ये माडवे खु माडवे बु व खांडवे याचा समावेश आहे मात्र माडवे खु गावाने मतदान न करता सर्व पक्षाचे एक एक असे तिन सदस्य बिनविरोध केले व निवडणूकीत माडवे बु. या गावातून 5 सदस्य तर खाडवे येथील 1 असे 9 सदस्य असतात. माडवे बु. गावात भाजपचे वर्चस्व असल्याने व एकाच पनलचे तीन सदस्य एका बाजूने निवडून आल्याने स्वतंत्र निवडणूक लढणाऱ्या दोन सदस्यांनी माडवे खुर्द च्या सदस्य याना सोबत घेत विरोधी पक्षाचा झेंडा लावण्यासाठी व सरपंच पदाचे लालसेपोटी पाच सदस्य सोबत घेवून पलायन केले.

सरपंच, उपसरपंच पदाचा होण्याचा निर्णय घेतला

तीन सदस्यांना घेवून पलायन केल्यांतर आरक्षण सोडत जाहिर झाली. पाच सदस्यांपैकी दोघांनी सरपंच व उपसरपंच होण्याचा निर्णय घेत असल्याचा अंदाज सोबतच्या सदस्यांना आल्याने आपल्याला संधी देत नसल्याचा स्वता: फायदा घेत असल्याचा अंदाज तीन सदस्यांना आला. आणि पूर्वीचे भाजपवाशी असलेले सदस्य पुन्हा भाजपमध्ये प्रवेश करून घराचा रस्ता धरला. आणि मारोती मंदिरात देवावर पाणी सोडून शपथ मोडल्याची चर्चा, तर सदस्यांना देवाच्या नावाने दबाव टाकून फसवणूक करनाऱ्या पॅनल प्रमुखाच्या नावाने विडीओ व्हायरल झाला आहे.

स्वप्न हे स्वप्नचं राहीले..

सदस्याना वेठीस धरणाऱ्या गावकरी व ज्यानी सरपंच पदाचे स्वप्न पाहिले ते धुळीस मिळाल्याने त्याच्या हातून आलेली संधी गेल्यामुळे त्या सदस्याच्या ना घरके ना घाट के अशी अवस्था झाली आहे.

संपादन- भूषण श्रीखंडे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com