शिपाईचा मुलाने...एमपीएसी परिक्षेत मिळवीले यश; ग्रुप सी परीक्षेत महाराष्ट्रात तिसरा !

विलास जोशी 
बुधवार, 15 जुलै 2020

भविष्यात  लोकसेवा आयोगाच्या  माध्यमातून उच्च्य पदावर सेवा बजावण्याचा त्याचा मानस आहे. या यशामध्ये त्याच्या मेहनती बरोबरच आई-वडील या दोघांची प्रेरणाही तेवढीच महत्वाची आहे

वाकोद ता जामनेर : जंगीपुरा ता जामनेर येथील शेंदुर्णी शिक्षण संस्थेत शिपाई म्हणुन काम करत असलेले अनिल फूलचंद परदेशी यांचा मुलगा अक्षय परदेशी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत महाराष्ट्रात तीसरा येण्याचा बहुमान त्याने मिळवला असून तो शेंदुर्णी शिक्षण संस्थेचाच माजी विद्यार्थी आहे त्याच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. 
 

२०१९ मध्ये झालेल्या एम् पी एस सी परीक्षेचा निकाल नुकताच लागला असून,त्यात आचार्य गजनानराव गरुड विद्यालय शेंदुर्णी येथील माजी विद्यार्थी अक्षय अनिल परदेशी रा.जंगीपुरा (मुळगाव गाळण ) याचा ग्रुप सी च्या मुख्य परीक्षेत १४० गुण मिळवून क्लर्क टाइपिस्ट पदासाठी निवड यादीत महाराष्ट्रातून तृतीय क्रमांक आला.प्रथम क्रमांकाच्या विद्यार्थ्याला १४६ गुण प्राप्त झालेले असून,द्वितीय आणि तृतीय दोघांना सारखेच (१४०) गुण मिळाले आहेत.

अक्षय हा एका सर्वसाधारण कुटुंबातील असून,आर्थिक परिस्थिती हि बेताची आहे.वडील शेंदुर्णी संस्थेत शिपाई या पदावर नोकरी करतात.महागडे क्लासेस,पुस्तकं,सेमिनार या सारख्या मार्गदर्शक बाबींसाठी लागणारा खर्च परिवाराच्या आवाक्याबाहेरचा विषय आहे, याची जान अक्षयला होती.परिवारातील दोन बहिणी,आई-वडील,आजी या सर्वांची भविष्यातील जबाबदारी त्याच्या डोळ्यासमोर होती.मनात असलेली जिद्द त्याला स्वस्थ बसू देत नव्हती,आर्थिक परिस्थिती हालाकीची असल्याने समाजात होणारी अवहेलना मनस्ताप वाढवत होती,या सारख्या गोष्टींवर इतरांसारखे नशिबाला दोष न देत बसता या गोष्टींचाही सकारात्मक पद्धतीने आपल्या जीवनात उपयोग करून,छोट्या-मोठ्या कामात हाथभार लावून,दोन पैसे मिळाल्यावर त्यातून अभ्यासासाठी सामग्री विकत घेत चिकाटीने आपल्या लक्षाकडे वाटचाल करत,आलेल्या अडचणींना सामोरे जावून त्याने आपल्या ध्येयावरच लक्ष केंद्रित केले.आणि अखेर यशाचा पहिला टप्पा त्याने पार केला.

भविष्यात  लोकसेवा आयोगाच्या  माध्यमातून उच्च्य पदावर सेवा बजावण्याचा त्याचा मानस आहे. या यशामध्ये त्याच्या मेहनती बरोबरच आई-वडील या दोघांची प्रेरणाही तेवढीच महत्वाची आहे.त्याच्या या कार्याने परिवार, समाज, गाव, आप्तेष्ट या साऱ्यांचीच मान उंचावली असून,पंचक्रोशीत अक्षयचे कौतुक होत आहे. शेंदुर्णी संस्थेचे चेअरमन संजय गरुड, सचिव सहसचिव, चेअरमन प्रतिनिधी,संचालक,संस्थेतील सर्व कर्मचारी,तसेच गाळण व जंगीपुरा येथील सर्व सन्माननीय ग्रामस्थ,आप्तेष्ठ साऱ्यांनीच कौतुकाचा वर्षाव करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jamner Peon's son succeeds in Maharashtra Public Service Commission examination